'उल्टा चोर, कोतवाल को डांटे' ही म्हण सर्वांनाच माहित आहे. पण ही म्हण जर कोणी खरी करून दाखवली असेल तर ती आहे अमेरिकन शॉर्टसेलर हिंडनबर्ग याने. पुन्हा एकदा हिंडनबर्गने चुकीचा आणि भ्रम निर्माण करणारा रिपोर्ट समोर आणला आहे. त्यामुळेच या हिंडनबर्गला 'उल्टा चोर, कोतवाल को डांटे' ही म्हण फिट बसत आहे. हिंडनबर्गला अनफेयर ट्रेड प्रैक्टिससह अजून काही प्रकरणात सेबीने एक नोटीस पाठवली होती. ही नोटीस दिड महिन्या पुर्वी पाठवण्यात आली. या नोटीसला हिंडनबर्गने उत्तर देणे गरजेचे होते. पण ते उत्तर न देता त्याने SEBI च्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्यावरच खोटे आरोप लावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे घटनाक्रम?
या संपुर्ण प्रकरणाचा आपण एक घटनाक्रम पाहूयात. म्हणजे सर्व गोष्टी या स्पष्ट होतील.
-या प्रकरणाची सुरूवात झाली ती जानेवारी 2023 मध्ये
-हिंडनबर्गने अदाणी ग्रुपवर शेयर्स बरोबर छेडछाड केल्याचा आरोप लावला
-खोट्या रिपोर्टच्या माध्यमातून शेयर्स कोसळले
-त्यानंतर FPI च्या मदतीने शॉर्टसेलिंगच्या सहाय्याने फायदा कमावला
- सेबीने याची चौकशी केली, अदानी ग्रुपला यात क्लिनचिट देण्यात आली
- शॉर्टसेलर चुकीचा असल्याचे त्यानंतर सेबीने स्पष्ट केले
- प्रकरण सुप्रिम कोर्टात गेले, तिथेही अदाणी ग्रुपला क्लिन चिट मिळाली
- सेबीच्या चौकशीत शॉर्टसेलर दोषी आढळून आला
- 27 जून ला SEBI ने हिंडनबर्ग आणि FPI मार्क किंग्डन आणि नाथन एंडरसनला नोटीस पाठवली
- पण नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही, उलट सेबीवर आरोप लावले
- आता सेबीच्या अध्यक्षांवर हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे
ट्रेंडिंग बातमी - हिंडनबर्गचा रिपोर्ट तथ्यहीन, SEBI च्या प्रमुखांनी आरोप फेटाळले
आता हिंडनबर्गच्या रिपोर्ट विरोधात अनेक जण पुढे येवून बोलत आहेत. आधी सेबीवर आरोप लावले गेले. त्यानंतर सेबी प्रमुखांवरही आरोप केले आहेत. या विरोधात राजकीय आणि उद्योग जगतातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सेबीने 27 जून ला अमेरिकेच्या शॉर्टसेलर हिंडनबर्ग रिसर्च, नाथन एंडरसन आणि मॉरिशस बेस्ड FPI मार्क किंग्डन यांना कारण दाखवा नोटीस बजावली होती. SEBI ने अदाणी एंटरप्राइजेजच्या शेयर्सच्या ट्रेडिंग नियमांच्या उल्लंघन प्रकरणी ही कारवाई केली होती. सेबीने हिंडनबर्गवर नियमांचे उल्लंघन केल्याचे ताशेरे ओढले आहेत.
हिंडनबर्ग ने या सर्व प्रकरणात नफा कमावला. चुकीचा रिपोर्ट समोर आणला. याबाबत हिंडनबर्गने उत्तर देणे गरजेचे होते. पण त्यांनी तसे न करता सेबीच्या अध्यक्षांवरच खोटे आरोप लावले आहे. दरम्यान हिंडनबर्गने लावलेले सर्व आरोप अदाणी ग्रुपने फेटाळले आहेत. शिवाय हे आरोप दुर्दैवी आणि चुकीचे असल्याचेही स्पष्ट केले आहेत.
शॉर्टसेलर फर्म हिंडनबर्गने जारी केलेल्या नवीन अहवालावर सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माधबी पुरी बुच यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलं की, सेबीने हिंडनबर्ग विरुद्ध तपास करुन कारवाई केली होती आणि कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावरुन आता हिंडनबर्गने माझ्यावर चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. SEBI च्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी परिपत्रक जारी करून शॉर्टसेलर हिंडेनबर्गने केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. या आरोपांचा सत्याशी काहीही संबंध नाही. माधबी पुरी बुच यांनी या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले की, "आमचे जीवन आणि आमचे व्यवहार हे एक खुले पुस्तक आहे, आम्ही वेळोवेळी सेबीला सर्व खुलासे दिले आहेत." असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.