भारतीय शेअर बाजाराच्या मजबूतीमुळे हिंडनबर्ग अस्वस्थ, नवा रिपोर्ट बाजार कोसळवण्यासाठीच: तज्ज्ञ

हिंडनबर्गने आपल्या अहवालात जे दावे केले आहेत ते सेबी प्रमुख आणि अदाणी ग्रुपने फेटाळून लावले आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

अमेरिकन शॉर्ट सेलर Hindenburg त्या निशाण्यावर यावेळी सेबी प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच हे आहेत. हिंडनबर्गचा हा नवा डाव असल्याचे तज्ज्ञ मानतात. यामुळे भारतीय शेअर बाजाराला प्रभावीत करण्याचा त्यांचा डाव असल्याचेही तज्ज्ञ सांगत आहेत. हिंडनबर्गने आपल्या अहवालात जे दावे केले आहेत ते सेबी प्रमुख आणि अदाणी ग्रुपने फेटाळून लावले आहेत. शिवाय ते निराधार आणि दुर्दैवी असल्याचेही म्हटले आहे. 

माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या ट्वीटवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात या रिपोर्टच्या माध्यमातून एखाद्या संस्थेला  बदनाम करण्याचा प्रकार आहे. यातून गुंतवणूकदारांमध्ये अराजकता निर्माण केली जात आहे. त्यातून त्यांचे नुकसानही केले जात आहे. असे झाल्यास बाजारात असलेली तेजी कमी करता येईल. 
 

कारेलियन एसेट मैनेजमेंट एंड एडवाइजर्स (Carnelian Asset Management & Advisors.) चे संस्थापक  विकास खेमानी यांनी ही आपल्या ट्वीटवर याबाबत लिहीले आहे. ते लिहीतात की भारताचे कॉरपोरेट गवर्नेंस स्टैंडर्ड विकसीत देशांपेक्षा किती तरी पटीने चांगले आहे. जे लोक आम्हाला गवर्नेंसचा सल्ला देत आहेत, त्यांचे शेअर बाजार उलट अधिक जोखमीचे आहेत. मी असं म्हणत नाही की आमच्याकडे काही समस्या नाहीत. आमच्याकडेही समस्या आहेत पण त्याचा अर्थ असा नाही की त्याच्या विश्वसनियतेवर वारंवार प्रश्न निर्माण कराल.  
 

Advertisement

इंफोसिस चे पूर्व CFO मोहनदास पई यांनी हिंडनबर्गचा रिपोर्ट म्हणजे चरित्र हननाचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. तेही ट्वीटरवर व्यक्त झाले आहेत. सनसनी निर्माण करण्यासाठी असे वेडे पणाचे आरोप केले गेले आहेत. यात त्यांनी सेबीचाही बचाव केला आहे. सेबीचे सर्व नियम हे पारदर्शक आहेत. हे सर्व नियम ग्लोबल स्टैंडर्ड प्रमाणे आहेत. 

Advertisement


कैपिटलमाइंडचे CEO दीपक शेनॉय यांनी ही हिंडनबर्गचे आरोप हे तथ्यहिन असल्याचे म्हटले आहे. 
 

भारत सरकारचे 17 वे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती  सुब्रमण्यम यांनीही हिंडनबर्गच्या रिपोर्टवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सेबीच्या प्रमुखांना पाठिंबा देताना म्हटले आहे की 'मी सेबीच्या प्रमुख माधवी यांना जवळपास दोन दशकापासून ओळखतो. त्यांची निष्कलंक छबी, सत्याची साथ, त्यांची बौद्धीक क्षमता या आधारावर त्या या रिपोर्टची चिरफाड करतील असा विश्वास आहे. 
 

Advertisement

इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स वकील साफिर आनंद यांनी म्हटले आहे की शेअर बाजार तेजीत आहे. त्यामुळे हिंडनबर्गने केलेले काम हे निराशेतून केलेले आहे. ते म्हणतात हे सर्व हिंडनबर्गने निराशे पोटी केले आहे.  NAV कैपिटलचे  मॅनेजिंग डायरेक्टर विनीत अरोड़ा यांनी या रिपोर्ट बद्दल आपले मत मांडले आहे. हिंडनबर्गचा हेतू चांगला नाही. त्यांना लोकांना त्रास देवून पैसे छापायचे आहेत. 
 

सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न : AMFI

SEBI च्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर करण्यात आलेले आरोप त्यांनी  भारतीय कैपिटल मार्केटसाठी दिलेले योगदान कमी करणारी आहे. येवढेच नाही तर आपल्या देशाच्या आर्थिक प्रगती कमजोर करणारी आहे. शिवाय शेअर बाजाराच्या इकोसिस्टमच्या विश्वासालाही तडा देणारी आहे. केवळ सनसनी निर्माण करणे हाच एकमेव हेतू या रिपोर्ट मागे आहे.

जर हे प्रकरण असेच सोडून दिले तर जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागेल. यातून देशाचीही बदनामी होत आहे. अशा आरोपांमुळे विकसित अर्थव्यवस्था बनण्याच्या आपल्या स्वप्नात रोडा घातला जात आहे, त्यादृष्टीनेच या आरोपांकडे पाहीले पाहीजे. गुंतवणूकदार असो की राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय बाजार असो दोघांनाही भारतीय अर्थ प्रणाली सुरक्षित आणि पारदर्श आहे हे समजणे गरजेचे आहे. 

Topics mentioned in this article