भारताला लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या इतके मजबूत बनवावे लागेल की अनेक शक्ती एकत्र आल्या तरी त्या जिंकू शकणार नाहीत. सीमेवर शत्रू सैन्याचे कारस्थान सतत दिसत आहे, अशा परिस्थितीत भारताकडे बलशाली होण्याशिवाय पर्याय नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बंगळूर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर बोलताना सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
द ॲागनाझरला दिलेल्या मुलाखतीत भागवतांनी हे मत मांडले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "हिंदू समाज आणि भारत एकसारखेच जोडलेले आहेत. हिंदू समाज बलशाली झाला तर भारतही मजबूत होईल. जागतिक स्तरावर आता धर्मावर आधारित क्रांतीची गरज आहे. धर्म म्हणजे कोणताही पंथ नसून सत्य, पवित्रता, करुणा आणि यांसारख्या मूल्यांचा अर्थ आहे."
तसेच संघ ही त्याच तत्त्व-आधारित संघटना आहे, ज्याची मूळ भावना अशी आहे की, भारत एक हिंदू राष्ट्र आहे. सत्ता असो वा नसो, त्यात धर्म आणि सद्गुणादेखील असले पाहिजेत. केवळ बळाचा वापर हिंसाचार वाढवू शकतो, असेही ते म्हणाले. हिंदूंना आदर मिळेल. 'हिंदू' अंतर्गत ताकद वाढत आहे. संघाच्या केलेल्या कामाचा परिणाम हळूहळू दिसून येईल. तोपर्यंत आपल्याला संघर्ष करत राहावे लागेल, असे महत्त्वाचे विधानही त्यांनी केले.
दरम्यान, त्यांनी असेही म्हटले की "जेव्हा हिंदू समाज मजबूत असतो तेव्हा जग त्याचा आदर करते. लोक म्हणतात की परदेशात हिंदूंना लक्ष्य केले जाते, परंतु जेव्हा हिंदू मजबूत उभे राहतात तेव्हा जगाला ते लक्षात येते. भागवत यांनी राष्ट्रीय सुरक्षेकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले आणि जातीय एकता, कौटुंबिक मूल्ये आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी यांचाही संबंध त्यांच्याशी जोडला. त्यांनी प्रश्न केला की जर समाज विभागला गेला तर तो स्वतःचे रक्षण कसे करेल? भागवत यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा पाया म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंच परिवर्तनाच्या (पाच बदल) कल्पनेचे वर्णन केले.