Sunday holiday: भारतात रविवारची सुट्टी कधी सुरू झाली? 'या' मराठी व्यक्तीच्या लढ्याने सर्वांना मिळाला अधिकार

1881 मध्ये रविवारच्या सुट्टीची मागणी त्यांनीच लावून धरली होती. त्यांनी ब्रिटीश सरकारकडे निवेदन सोपवले आणि आंदोलने केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ब्रिटीश राजवटीत भारतीय कामगारांना सलग काम करावे लागत होते
  • नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८१ ते १८८४ दरम्यान रविवारच्या सुट्टीसाठी मोठे आंदोलन उभारले केले
  • १८९० मध्ये लोखंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारतात अधिकृतपणे रविवारची सुट्टी लागू केली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

How was Sunday holiday implemented across India: ब्रिटीश राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची पिळवणूक होत होती. भारतातील ब्रिटीश राजवटीत कामगारांची स्थिती अत्यंत दयनीय होती. त्यावेळी कोणत्याही सुट्टीशिवाय सलग काम करावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. 1843 मध्ये तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी सरकारी कार्यालयांसाठी रविवारची सुट्टी अनिवार्य केली होती. परंतु सामान्य कामगारांसाठी असा कोणताही नियम नव्हता. त्यात भारतीयांची पिळवणूक होत होती. त्यांना सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे आराम ही नव्हता. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष होता. 

या असंतोषाला वाचा फोडली ती पुण्याच्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी. त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते.  नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवला. 1881 ते 1884 या काळात त्यांनी रविवारच्या सुट्टीसाठी मोठे आंदोलन उभारले. ब्रिटीश सरकारला निवेदने देणे आणि कामगारांच्या सभा घेणे याद्वारे त्यांनी दबाव निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना एकवटल्या आणि अखेर ब्रिटीश सरकारला नमते घ्यावे लागले. ब्रिटीश अधिकाऱ्यांना कामगारांना जशी रविवारी सुट्टी असते तशी भारतीयांना ही मिळाली अशी त्यांची मागणी होती. 

नक्की वाचा - Sunetra Pawar: अर्थ खातं नाही पण 'या' दोन जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांकडे कायम, शासन निर्णय ही निघाला

1890 मध्ये या मागणीला यश मिळाले. लोखंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 10 जून 1890 रोजी भारतात पहिल्यांदा अधिकृतपणे रविवारची सुट्टी जाहीर करण्यात आली. सुरुवातीला सरकारी कार्यालये आणि हळूहळू खाजगी कंपन्या, शाळा, पोस्ट आणि रेल्वेमध्ये हा नियम लागू झाला. आजच्या धावपळीच्या जीवनात जो 'वर्क-लाइफ बॅलन्स' आपण अनुभवतो, त्याचा पाया लोखंडे यांनीच रचला होता. एका मराठी माणसाच्या संघर्षामुळे रविवारीची सु्ट्टी आज भारतीय उपभोगत आहेत. त्यांनी लढा जरी मुंबई उभारला असला तरी त्याचे फळ संपूर्ण भारताला मिळाले होते. 

नक्की वाचा - Home Remedies: भूक लागत नाहीये? मग 'हे' 5 घरगुती उपाय करून नक्की पाहा, झटपट वाढेल भूक

देशातील पहिले ट्रेड युनियन नेते म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांची ओळख आहे. 1881 मध्ये रविवारच्या सुट्टीची मागणी त्यांनीच लावून धरली होती. त्यांनी ब्रिटीश सरकारकडे निवेदन सोपवले आणि आंदोलने केली. त्यांच्या या आंदोलनाला मोठे जनसमर्थन मिळाले. अखेर 10 जून 1890 रोजी संपूर्ण देशात रविवारची सुट्टी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.  विश्रांतीचा हक्क या सुट्टीमुळे कामगार वर्गाला मिळाला होता. शिवाय मानसिक शांतता मिळाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात संतुलन निर्माण झाले. लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळेच आज रविवार हा दिवस 'रेस्ट डे' म्हणून साजरा केला जातो.

Advertisement