Worlds Most Dogs 2025: जगात सर्वाधिक कुत्रे कुठल्या देशात आहेत? टॉप 10 देशात भारताचा नंबर कितवा?

ज्या देशात सर्वात जास्त कुत्रे आहे ते टॉप टेन देशांची माहिता आपण जाणून घेवूयात.

जाहिरात
Read Time: 3 mins

Worlds Most Dogs 2025: भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टानेही दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना शेल्टर हाऊसमध्ये पाठवण्याचे आदेशही दिले होते. सरकारी आकडेवारी नुसार देशात जवळपास 1.53 करोड भटके कुत्रे आहेत. यातील 70 टक्के कुत्र्यांची नसबंदी पुढच्या एक वर्षात करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून लोकांचे संरक्षण होईल आणि भटक्या कुत्र्यांची संख्या ही नियंत्रणात राहण्यास मदत होईल. पण जगात सर्वात जास्त भटके कुत्रे कुठे आणि कोणत्या देशात आहे हे तुम्हाला माहित आहे का?  ज्या देशात सर्वात जास्त कुत्रे आहे ते टॉप टेन देशांची माहिता आपण जाणून घेवूयात.    

जगात सर्वाधिक कुत्र्यांची संख्या असलेले टॉप 10 देश

1.अमेरिका (America)
जगामध्ये सर्वात जास्त कुत्रे अमेरिकेत आहेत. त्यांची एकूण संख्या 7.58 कोटी आहेत. येथे कुत्र्यांसाठी विशेष डॉग पार्क, ग्रूमिंग पार्लर आहेत. अमेरिकेत कुत्र्यांसोबत क्रूर वागणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते.

2.ब्राझील (Brazil)
ब्राझीलमध्ये जवळपास प्रत्येक दुसऱ्या घरात एक कुत्रा आहे. मध्यवर्गीय कुटुंबांची वाढती संख्या आणि जीवनशैलीतील बदलांमुळे लोक कुत्र्यांना कुटुंबाचा एक भाग मानतात. येथे कुत्र्यांची संख्या 3.57 कोटी आहे.

3.चीन (China)
चीनमध्ये पाळीव कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेकजण भटक्या कुत्र्यांचीही काळजी घेतात. बीजिंगमध्ये पाळीव कुत्रे ठेवणे आधी बेकायदेशीर होते. पण आता त्यात शिथिलता आल्यामुळे पाळीव कुत्र्यांचा बाजार वाढला आहे. चीनमध्ये कुत्र्यांची एकूण संख्या 2.74 कोटी आहे.

Advertisement

4.भारत (India)
भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या 1.53 कोटी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सरकार पुढील एका वर्षात यापैकी 70% कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

5.रशिया (Russia)
रशियामध्येही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. 'मेट्रो डॉग'सारखे कुत्रे मेट्रोमध्ये प्रवास करायला शिकले आहेत. येथे कुत्र्यांची संख्या 1.5 कोटी आहे.

Advertisement

6.जपान (Japan)
जपानमध्ये लोक मुलांना दत्तक घेण्याऐवजी पाळीव कुत्र्यांना जास्त महत्त्व देतात. त्यांना कुटुंबाचा भाग मानले जाते. त्यांना खूप प्रेम दिले जाते. जपानमध्ये कुत्र्यांची संख्या 1.2 कोटी आहे.

7.फिलीपीन्स (Philippines)
फिलीपीन्समध्ये रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे सरकारने कुत्र्यांना मारण्याऐवजी लसीकरण आणि नसबंदीचा मानवी दृष्टिकोन स्वीकारला. येथे कुत्र्यांची संख्या 1.16 कोटी आहे.

Advertisement

8.अर्जेंटिना (Argentina)
अर्जेंटिनामध्ये पाळीव कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत आहे. अपार्टमेंटमध्येही लोक कुत्रे पाळतात. लसीकरण आणि नसबंदी कार्यक्रमांमुळे त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येथे कुत्र्यांची संख्या 92 लाख आहे.

9.फ्रान्स (France)
फ्रान्समध्ये 4 लाख कुत्रे आहेत. फ्रेंच लोक कुत्र्यांना कुटुंबाचा हिस्सा मानतात. प्रत्येक कुत्र्याला मायक्रोचिप लावणे अनिवार्य आहे. लसीकरणामुळे रेबीजचे प्रमाण खूप कमी आहे.

10.रोमानिया (Romania)
रोमानियामध्ये 41 लाख कुत्रे आहेत. 1980 च्या दशकात लोकांना गावे सोडून शहरांमध्ये जावे लागल्याने अनेक कुत्रे रस्त्यावर सोडले गेले. ज्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली.

(स्रोत: WorldAtlas आणि सरकारी आकडेवारी)