Samosa Scandal : मुख्यमंत्र्यांचे समोसे कुणी खाल्ले? सरकारनं केली CID चौकशी

Himachal CM : हिमाचल प्रदेशमधील सुखविंदर सिंह सुक्खू सरकार रोज नव्या वादात अडकत आहेत. ताजा वाद समोसाबाबत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

हिमाचल प्रदेशमधील सुखविंदर सिंह सुक्खू सरकार रोज नव्या वादात अडकत आहेत. ताजा वाद समोसाबाबत आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांच्यासाठी आणलेले समोसे आणि केक त्यांना न देता त्यांच्या सुरक्षारक्षकांना दिले गेले. त्यामुळे वाद निर्माण झाला. सरकारनं त्यावर कहर करत या प्रकरणाची सीआयडी चौकशी केली. या चौकशीत मुख्यमंत्र्यांचा समोसा खाणं ही 'सरकारविरोधी कृती' असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

हिमाचलचे मुख्यमंत्री सुक्खू 21 ऑक्टोबर रोजी सीआयडी मुख्यालयात एका  कार्यक्रमासाठी ऑक्टोबर रोजी गेले होते. त्यावेळी रेडिसन ब्लू हॉटेलमधून त्यांच्यासाठी समसो आणि केकचे तीन डबे आणले होते. पण, पोलीस उपाधिक्षक स्तराच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनुसार समन्वयाच्या गोंधळ असल्यानं मुख्यमंत्र्यांना खाण्यासाठी आणलेले पदार्थ त्यांच्या सुरक्षा रक्षकांना वाढण्यात आले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या रिपोर्टमधील माहितीनुसार महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानं पोलीस उपनिरीक्षकांना (एसआय) मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी हॉटेलमधून खाद्यापदार्थ आणण्याचे आदेश दिले होते. उपनिरीक्षकांनी त्यांचे सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलला खाद्यपदार्थ आणण्याची सूचना केली.

या आदेशानुसार पोलीस कर्माचाऱ्यांनी हॉटेलमधून तीन सीलबंद डब्यातून खाद्यपदार्थ आणले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबानीनुसार, त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे खाद्यपदार्थ मुख्यमंत्र्यांना वाढायचे आहेत का? हे विचारलं. त्यावर त्यांनी हे पदार्थ मेनूमध्ये नाहीत, असं सांगितलं. 

Advertisement

( नक्की वाचा : भिंतीमधून पडत होतं AC चं पाणी, चरणामृत समजून पिण्यासाठी झाली गर्दी, प्रसिद्ध मंदिरातील Video Viral )

चौकशी अहवालानुसार, त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक तसंच त्यांनी खाद्यपदार्थ आणण्यास सांगितले आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्यांना हे सर्व पदार्थ मुख्यमंत्री सुख्खू यांच्यासाठी आणले आहेत, याची कल्पना होती.

Advertisement

या अधिकाऱ्यांनी महिला निरीक्षकांना खाद्यपदार्थाचे डबे सोपवले. त्यांनी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न विचारता हे पदार्थ यांत्रिक परिवहन विभागाकडं सोपवले. हा विभाग खाद्यपदार्थांची व्यवस्था पाहतो. 

विशेष म्हणजे सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनं त्यांच्या रिपोर्टमध्ये सर्व व्यक्तींचा उल्लेख केला आहे. तसंच या सर्वांनी सरकारविरोधी कृती केली असून त्यामुळे या वस्तू अतिविशिष्ट व्यक्तींना मिळाल्या नाहीत, असं स्पष्ट केलंय. या सर्व अधिकाऱ्यांनी एका विशिष्ट अजेंड्यानं काम केलं, असा ठप्पा त्यांनी ठेवला आहे.

Advertisement

हे सर्व प्रकरण आता उघडकीस आलं आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सक्खू यांना या विषयावर प्रश्न विचारला त्यावर त्यांनी धन्यवाद असं सांगत उत्तर देणं टाळलं. भाजपानं या विषयावर सरकारवर टीका केलीय. सुख्खू सरकारला राज्याच्या विकासापेक्षा समोस्यांची चिंता आहे, असा टोला भाजपानं लगावला आहे.