भारतीय रेल्वेतून (Indian Railways) रोज लाखो जण प्रवास करतात. या प्रवासात अनेकदा सामान हरवतं किंवा ते प्रवासाच्या दरम्यान प्लॅटफॉर्मवर उतरले असताना गडबडीमध्ये रेल्वे सुटते. या परिस्थितीमध्ये अनेक जण सामान हरवल्यानंतर किंवा चोरी झालं तर त्याची तक्रार करत नाहीत. हे सामान आपल्याला परत कधी वापस मिळणार नाही, अशी त्यांची समजूत असते. तुम्हालाही भविष्यात कधी असा अनुभव आला, तुमचंही सामान हरवलं (Lost Luggage in Train) तर काळजी करु नका. भारतीय रेल्वेच्या सुविधांचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं हरवलेलं सामान परत मिळवू शकता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे पद्धत?
अनेकदा लोकांना या सुविधेची माहिती नसते. त्यामुळे ते या सुविधाचा फायदा घेत नाहीत. रेल्वे प्रवासाच्या दरम्यान तुमचं सामान हरवलं तर तुम्ही काय करावं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रेल्वे प्रवासाच्या दरम्यान तुमचं सामान हरवलं किंवा काही कारणामुळे तुम्ही प्लॅटफॉर्मवर उतरला आणि तुमची रेल्वे सुटली. त्या रेल्वेमध्ये तुमचं सामना असेल तर काळजी करु नका. तुम्हा तातडीनं रेल्वे मदत अॅप (Rail Madad App) किवा रेल्वे मदत वेबसाईटवर जाऊन त्याबाबत तक्रार करु शकता. या अॅप किंवा वेबलाईटवर तुम्ही फक्त हरवलेल्या सामानाची नाही तर बाथरुमची स्वच्छता, रेल्वे प्रवासातील छेडछाड किवा अन्य एखाद्या घटनेचीही तक्रार करु शकता.
( नक्की वाचा : रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम )
त्याचबरोबर तुम्हाला रेल्वे अधिक उत्तम करण्यासाठी काही सूचना करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही देऊ शकता. रेल्वे मदतीची ऑफिशियल वेबसाईट railmadad.indianrailways.gov.in/madad/final/home.jsp आहे. त्या वेबसाईटवर जाऊन ही तक्रार देऊ शकता. तुम्ही आता यापुढं कधी रेल्वेनं प्रवास करणार असाल तर ही माहिती नक्की लक्षात ठेवा. तसंच तुमच्या सोबतच्या प्रवाशांना देखील द्या. त्यांना देखील अडचणीच्या परिस्थितीमध्ये या माहितीचा उपयोग होईल.
अडीच लाखांचं मंगळसूत्र परत मिळालं
गेल्या महिन्यात 18238 अमृतसर-बिलासपुर छत्तीसगढ़ एक्सप्रेसमधील B-2 कोचमधून एक कुटुंब प्रवास करत होतं. हे कुटुंब भोपाळहून दूर्गला चाललं होतं. प्रवासाच्या दरम्यान त्या कुटुंबातील एका महिलेचं तब्बल अडीच लाख किंमतीचं मंगळसूत्र हरवलं. त्या महिलेनं ही तक्रार (Rail Madad App) वर केली. ही तक्रार मिळतात रेल्वे प्रशासनानं ही माहिती ऑनबोर्ड मुख्य तिकीट अधिक्षक CTI रजत सरकार यांना दिली.
( नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )
CTI यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मंगळसूत्र शोधण्याची मोहीम सुरु केली. मंगळसूत्र सापडलं नाही तर रायपूर स्टेशनमध्ये रेल्वे पोलीस फोर्स (RPF) बोलवून संपूर्ण कोचची तपासणी केली जाईल, असं जाहीर केलं. काही वेळानं एका महिला प्रवासीनं CTI यांना मंगळसूत्र खाली पडल्याची माहिती देत ते परत दिलं.