मोमोज जीवावर बेतले! महिलेचा मृत्यू, 40 जणांची तब्येत बिघडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका 31 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि 25 ऑक्टोबर रोजी कथितरित्या रस्त्यावरील स्टॉलमधून मोमोज खाल्ल्याने 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेशमा बेगम असं मृत महिलेचं नाव आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये कथितपणे मोमोज खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू आणि 40 हून अधिक लोकांची तब्येत बिघडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली की, पीडितांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, दोन एफआयआर नोंदवले गेले आहेत. ज्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका 31 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि 25 ऑक्टोबर रोजी कथितरित्या रस्त्यावरील स्टॉलमधून मोमोज खाल्ल्याने 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेशमा बेगम असं मृत महिलेचं नाव आहे. 

रेशमा या त्यांची मुले आणि इतर काही जणांसोबत मोमोज खाण्यासाठी गेले होते. मात्र मोमोज खाल्ल्यानंतर रेशमा यांना उलटीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर निजाम इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये रेफर करण्यात आलं होतं. तिथे त्यांचा मृत्यू झाला.