हैद्राबाद: मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे.. अशी चिठ्ठी लिहून एका महिलेने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना हैद्राबादमध्ये घडली. पूजा जैन असं या महिलेचे नाव असून तिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हैदराबादच्या हिमायतनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ४३ वर्षीय पूजा जैन या महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना तिचा पती अरुण कुमार जैन त्याच्या ऑफिसला गेला असताना घडली. गेल्या काही दिवसांपासून पूजा जैन अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीमध्ये गुंतलेली होती. याच अंधश्रद्धेतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
VIDEO: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची 10 कोटींची कार जळून खाक; व्हिडीओ व्हायरल
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना एक सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये पूजाने लिहिले होते की ती देवाला भेटण्यासाठी स्वतःचे बलिदान देत आहे. सुसाईड नोटमध्ये तिने स्पष्ट केले की तिने पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे पाऊल उचलले आहे जेणेकरून ती परमेश्वराच्या जवळ जाऊ शकेल.
शेजाऱ्यांच्या मते, पूजा अलिकडच्या काळात ध्यान, पूजा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अति रस घेऊ लागली होती. ती अनेकदा म्हणायची की आता तिला सांसारिक जीवनातून मुक्तता हवी आहे आणि तिला देवाला शरण जावे लागेल. त्याच वेळी, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या कोणताही कट किंवा मानसिक आजार असल्याचा संशय नाही, परंतु पोलिस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
UP Accident: भीषण, भयंकर अपघात! भाविकांची बोलेरो कालव्यात कोसळली, 11 जणांचा दुर्दैवी अंत