तुमच्याकडे अजूनही 2 हजारांची गुलाबी नोट असेल तर कशी बदलून घ्याल?

विशेष बाब म्हणजे राहिलेल्या 2000 च्या नोटा रद्दी झालेल्या नाहीत. फक्त व्यवहारात याचा वापर केला जाऊ शकत नाही,

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर 2000 रुपयांची नोट वापरात आणता येऊ शकत नाही. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जमा करण्यास सांगितल्या होत्या. यानंतर मर्यादा वाढवून ही मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली. मात्र अद्याप तुम्ही काही कारणास्तव नोट जमा करू शकला नसला तरी वेळ गेलेली नाही. तुम्ही आताही नोट जमा करू शकता.

विशेष बाब म्हणजे राहिलेल्या 2000 च्या नोटा रद्दी झालेल्या नाहीत. फक्त व्यवहारात याचा वापर केला जाऊ शकत नाही, मात्र बदलता येऊ शकतात. आरबीआयने यापूर्वी केलेल्या घोषणेनुसार, मुदत संपल्यानंतर बँकांमध्ये नोटा बदलण्याची सुविधा बंद करण्यात येईल. मग 2000 च्या नोटा कशा आणि कुठे जमा करू शकता? मुदत संपल्यानंतरही या नोटा रिझर्व्ह बँकेच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जमा करता येतील, अशी सूट आरबीआयने दिली होती. यासाठीचा पर्याय अजूनही खुला आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या उरलेल्या 2000 रुपयांच्या नोटा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आरबीआय कार्यालयात पाठवू शकता, परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल.

पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म भरून नोटा बदला...

2000 ची नोट अजूनही वैध्य आहे. या नोटा रद्दी झालेल्या नाहीत. तर या नोटा केवळ व्यवहारातून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे कुणाकडे 2000 ची नोट राहिली असेल तर त्याने मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा आणि त्यात आपल्या बँक खात्याच्या माहितीसह आपला आधार आणि पॅन नंबरची छायाप्रत जोडावी.

पोस्ट ऑफिसच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं, त्या व्यक्तीला या सर्व प्रक्रियेचे शुल्क द्यावे लागेल. यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यामार्फत फॉर्म आणि नोटा एका लिफाफ्यात बंद केल्या जातील आणि रजिस्ट्रीद्वारे आरबीआयला वितरित केल्या जातील. त्यानंतर 10 ते 15 दिवसांत आरबीआयकडून व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले जातात. ही प्रक्रिया भारतातील सर्व जिल्हा मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.

Advertisement

Topics mentioned in this article