Wine Prices: 12,500 ची शॅम्पेन 6000 रूपयांना! वाईन, विस्की, वोडका ही स्वस्त होणार , नवे दर काय?

मद्यासोबतच युरोपीय लक्झरी कार्सच्या किमतीही कमी होणार असल्याने भारतीय ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे विदेशी वाइन आणि शॅम्पेनच्या किमतीत मोठी घट होणार आहे
  • विदेशी वाइनवर असलेला १५० टक्के आयात शुल्क टप्प्याटप्प्याने २० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे
  • फ्रेंच, इटालियन आणि स्पॅनिश प्रीमियम मद्यांची किमती सुमारे अर्ध्यांनी कमी होऊन ग्राहकांसाठी परवडणारी होतील
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

भारत आणि युरोपीय संघ (EU) यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे (FTA) आता विदेशी मद्य, विशेषतः वाइन आणि शॅम्पेनच्या किमतीत मोठी घट होणार आहे. गेल्या 18 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा करार अखेर मार्गी लागल्याने युरोपातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्काचे ओझे कमी होणार आहे. सध्या भारत विदेशी वाइनवर 150% आयात शुल्क आकारतो, जे टप्प्याटप्प्याने 20% पर्यंत खाली आणले जाणार आहे. त्यामुळे विदेशी मद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. 

या निर्णयामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या फ्रेंच, इटालियन आणि स्पॅनिश वाइन भारतीय बाजारपेठेत स्वस्त होतील. सध्या ज्या शॅम्पेनच्या बाटलीसाठी ग्राहकांना 12,500 रुपये मोजावे लागतात, ती या करारानंतर केवळ 6,000 रुपयांना उपलब्ध होऊ शकते. यामुळे प्रीमियम ब्रँड्सच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या करारामुळे विदेशी मद्याच्या किमती जवळपास अर्ध्यावर येतील. युरोपातून मोठ्या प्रमाणात मद्य आयात केले जाते. त्यावर असलेल्या जास्त करामुळे त्याच्या किमती भारतात जास्त आहेत. 

नक्की वाचा - Viral Video: साडी काढली, अंतर्वस्त्रावर फिरली, रील ही बनवली, मनालीतील संतापजनक घटना

केवळ मद्यच नव्हे, तर युरोपीय देशांतून येणाऱ्या लक्झरी गाड्या आणि अन्य उत्पादनांच्या किमतीही या करारामुळे कमी होणार आहेत. जागतिक व्यापार क्षेत्रात भारताचे स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. समजा एका प्रीमियम शॅम्पेनची मूळ किंमत 5,000 रुपये असेल, तर सध्या त्यावर 150% टॅक्स लावून ती 12,500 रुपयांना मिळते. मात्र, नवीन नियमांनुसार हा टॅक्स केवळ 20% वर येईल, ज्यामुळे तीच बाटली तुम्हाला 6,000 रुपयांत पडेल. म्हणजेच एका बाटलीमागे थेट 6,500 रुपयांची बचत होणार आहे.

नक्की वाचा - Solapur News: संध्याकाळी 7 ते 9 मोबाईल- टीव्ही बंद ठेवा! 'या' तरुण महिला नगराध्यक्षांनी हा निर्णय का घेतला?

Advertisement

या करारामुळे फ्रान्सची प्रसिद्ध 'बोर्डो' वाइन, इटलीची 'प्रोसेको' आणि जर्मनीची प्रीमियम बीयर स्वस्त होईल. युरोपातील प्रीमियम जिन आणि वोदकाचे ब्रँड्सही आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. यामुळे युरोपीय ब्रँड्सचा भारतीय बाजारात दबदबा वाढणार आहे. फ्रान्स, इटली आणि स्पेनमधील प्रीमियम वाइन ब्रँड्स आता अधिक स्पर्धात्मक दरात उपलब्ध होतील. यामुळे केवळ ग्राहकांचा फायदा होणार नाही, तर दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांनाही नवी दिशा मिळणार आहे. मद्यासोबतच युरोपीय लक्झरी कार्सच्या किमतीही कमी होणार असल्याने भारतीय ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नक्की वाचा - Pune News: बारामतीच्या नगराध्यक्षावर शाही फेक, डॉ. आंबेडकरांच्या फोटोचा वाद चिघळला, भिमसैनिक आक्रमक

अशी असेल नवी दररचना

  • सध्याचा कर: 150%
  • प्रस्तावित कर: 20%
  • परिणाम: 15,000 रुपयांची विदेशी दारू आता अंदाजे 7,200 रुपयांना मिळेल.