Operation Sindoor Inside Story: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून 'ऑपरेशन सिंदूर ज्या प्रकारे पार पाडले, त्यामुळे संपूर्ण जग चकित झाले आहे. पाकिस्तान त्याचा कट्टर मित्र चीनच्या हवाई सुरक्षा प्रणालीवर अवलंबून होता. जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनच्या सुरक्षा यंत्रणेला बगल देत भारताने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आतपर्यंत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर बुधवारी भारताने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारताने पाकिस्तानात असलेल्या चीनच्या हवाई सुरक्षा प्रणालीला बगल देत हे ऑपरेशन पार पाडले, असे यामध्ये भारताकडून स्पष्ट करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑपरेशन सिंदूर आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मैलाचा दगड
Operation SINDOOR: The Rise of Aatmanirbhar Innovation in National Security... पीआयबीने जारी केलेल्या या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे की ऑपरेशन सिंदूर भारतीय लष्करी कारवायांमध्ये तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मैलाचा दगड आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची ही कारवाई जाणीवपूर्वक, अचूक आणि रणनीतिकदृष्ट्या उचललेले पाऊल होते.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याशिवाय भारतीय सैन्याने दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि अनेक तळ उद्ध्वस्त केले.
( नक्की वाचा : Indus Water Treaty : पाकिस्तानची पाण्यासाठी तडफड, पत्र लिहून केली विनंती, भारताची भूमिका काय? )
ऑपरेशनमध्ये 10 उपग्रहांची मदत
इस्रोचे संचालक व्ही. नारायणन यांनी 11 मे रोजी एका कार्यक्रमात सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी धोरणात्मक उद्देशाने किमान 10 उपग्रह चोवीस तास सतत कार्यरत आहेत.
( नक्की वाचा : Operation Sindoor भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अणुगळती झाली? परराष्ट्र मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण )
चिनी सुरक्षा प्रणालीला चकवा
पीआयबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात असलेल्या चीनच्या हवाई सुरक्षा प्रणालीला बगल देत ती जाम केली. हे मिशन केवळ 23 मिनिटांत पूर्ण झाले, ज्यामुळे भारताच्या तांत्रिक आघाडीचे प्रदर्शन झाले.
यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान आपल्या तांत्रिक क्षमतांचे प्रदर्शन करताना भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चीनने पुरवलेल्या हवाई संरक्षण प्रणालीला जाम केले आणि केवळ 23 मिनिटांत आपले मिशन पूर्ण केले.
पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली भारतीय हल्ल्यांना निष्प्रभ करू शकली नाही, ज्यामुळे त्यांनी वापरलेली चीनमध्ये बनलेली हवाई सुरक्षा प्रणाली पूर्णपणे निष्प्रभ ठरली.
चीनची क्षेपणास्त्रे, तुर्कीचे ड्रोन, पाकिस्तानचे रॉकेट पाडले
एका अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ने भारतीय प्रणालींद्वारे शत्रूच्या तंत्रज्ञानाला निष्प्रभ करण्याचे ठोस पुरावे देखील सादर केले. यामध्ये चीनमध्ये बनलेली बहुचर्चित पीएल-15 क्षेपणास्त्रे, तुर्कीमध्ये बनलेले वाईआयएचए कामिकेझ ड्रोन आणि पाकिस्तानचे लांब पल्ल्याचे रॉकेट, क्वाड-कॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोन यांचा समावेश होता. या सर्वांवर भारतानं मात केली.
सर्व हल्ले भारतीय मालमत्तेचे कोणतेही नुकसान न करता करण्यात आले, जे आपल्या देखरेख, नियोजन आणि वितरण प्रणालीची गुणवत्ता आणि प्रभावीपणाचं उदाहरण आहे, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
लांब पल्ल्याच्या ड्रोनपासून ते मार्गदर्शित युद्ध सामग्रीपर्यंत, आधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे हल्ले अत्यंत प्रभावी आणि राजकीयदृष्ट्या संतुलित करण्यात यश मिळाले. जप्त केलेल्या आणि ओळखल्या गेलेल्या अवशेषांवरून पाकिस्तानने उच्च तंत्रज्ञानाची परदेशी शस्त्रे वापरण्याचे निष्फळ प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतरही भारताचे स्वदेशी हवाई संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध नेटवर्क अधिक चांगले ठरले.