भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठा घटक आजही मोसमी पावसावर अवलंबून आहे. साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात अंदमान निकोबार आणि केरळच्या मार्गे मान्सूनचं आगमन होतं. त्यानंतर पुढील चार महिने मान्सूनचा देशात मुक्काम असतो. 2025 मध्ये पाऊस किती पडणार? याबाबतचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.
हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या या भाकितामुळे कृषीक्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. भारताच्या सकल सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) या क्षेत्राचा वाटा 18% आहे. त्याचबरोबर 42 टक्क्यांहून अधिक लोकांची उपजीविकाही शेतीवर अवलंबून आहे.
देशातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्रापैकी 52 टक्के क्षेत्र हे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने स्पष्ट केले आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच वीज निर्मितीसाठी ही यंत्रणा महत्त्वाची आहे.
( नक्की वाचा : 'मंदिरामध्ये शक्ती असती तर, घोरी, गझनी...' समाजवादी पार्टीच्या नेत्याचं संतापजनक वक्तव्य )
जून ते सप्टेंबर या काळात दीर्घकालीन सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. भारतीय उपखंडात सामान्यपेक्षा कमी मान्सूनला कारणीभूत ठरणारी अल निनो परिस्थिती यावर्षी देखील विकसित होण्याची शक्यता नाही, अशी माहिती हवामान विभागाचे (IMD) प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे.
पावसाळ्यात पाऊस पडणाऱ्या दिवसांची संख्या कमी होत आहे. तर मुसळधार पावसाच्या घटना (थोड्या कालावधीत जास्त पाऊस) वाढत आहेत, ज्यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर येतो, असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मान्सून सरासरीपेक्षा जास्त पडला तरी सर्व भागात समान पाऊस पडेल, असं नसतं असंही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.