Indian Army : जय हिंद! पूरग्रस्त पठाणकोटमध्ये लष्कराच्या जवानांनी वाचवले 25 प्राण, पाहा थरारक Video

Indian Army Rescue Operation Video : भारतीय लष्कराच्या एव्हिशन विंगने पंजाबमध्ये एक थरारक बचाव मोहीम राबवली आहे, ज्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही 'जय हिंद' म्हणाल.

जाहिरात
Read Time: 2 mins
भारतीय लष्कराने त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) आणि इंस्टाग्राम हँडलवर या थरारक बचाव मोहिमेचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
मुंबई:

Indian Army Rescue Operation Video : भारतीय लष्कराच्या एव्हिशन विंगने पंजाबमध्ये एक थरारक बचाव मोहीम राबवली आहे, ज्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही 'जय हिंद' म्हणाल. लष्कराने पंजाबमधील माधोपूर हेडवर्क्स येथे पुराच्या पाण्याने वेढलेल्या आणि कोसळण्याचा धोका असलेल्या एका इमारतीतून अडकलेल्या नागरिकांना आणि सीआरपीएफ जवानांना बाहेर काढले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोकादायक परिस्थिती असतानाही भारतीय लष्कराने पठाणकोटमध्ये ही अत्यंत जोखमीची बचाव मोहीम पार पाडली. पुराच्या पाण्याने वेढलेल्या इमारतीतून अडकलेले नागरिक आणि 25 सीआरपीएफ जवानांना बाहेर काढल्यानंतर काही सेकंदातच ती इमारत कोसळली.

थरारक व्हिडिओ

भारतीय लष्कराने त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) आणि इंस्टाग्राम हँडलवर या थरारक बचाव मोहिमेचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यात ती इमारत कोसळतानाचा व्हिडिओही आहे. ही मोहीम राबवण्यासाठी 'उच्चतम पातळीचे उड्डाण कौशल्य आणि अतुलनीय शौर्य' आवश्यक होते, असे लष्कराने म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी, एविएशन विंगच्या हेलिकॉप्टरना बचाव मोहिमेसाठी पाठवण्यात आले, ज्याने त्यांच्या साहस, कौशल्य आणि दृढ निश्चयाची परीक्षा घेतली.

इमारत लगेच कोसळली

आर्मी एव्हिएशनने पठाणकोटमधील रावी नदीवरील माधोपूर हेडवर्क्स या धरणावर ही बचाव मोहीम राबवली. अधिकृत निवेदनात लष्कराने म्हटले आहे, 'खराब हवामान आणि वेगाने वाढणाऱ्या पाण्याचा सामना करत, टीमच्या जलद आणि धाडसी प्रतिसादाने प्रत्येक जीव सुरक्षित राहण्याची खात्री केली.' धोकादायक परिस्थिती असूनही, लष्कराच्या वैमानिकांनी हेलिकॉप्टर कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या इमारतीवर उतरवले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपला जीव धोक्यात घालून सैनिकांनी प्रत्येक अडकलेल्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले. 'कोणतेही मिशन, कोणत्याही वेळी, कुठेही' या टॅगलाइनसह एका पोस्टमध्ये लष्कराने म्हटले आहे, 'धोक्याची जाणीव करून देत, ज्या इमारतीवर हेलिकॉप्टर उतरले होते, ती तिथून बाहेर पडताच लगेच कोसळली, जे वेळेवर आणि निर्णायक बचाव प्रयत्नांचे महत्त्व दर्शवते.'

Advertisement
Topics mentioned in this article