Tatkal Ticket New Rule: तात्काळ तिकीट बुकिंगचा नियम पुन्हा बदलला! नवा नियम काय आहे आणि तो कधीपासून लागू होतोय?

Tatkal Ticket New Rule: भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा आणि पारदर्शक बदल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Tatkal Ticket New Rule: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
मुंबई:

Tatkal Ticket New Rule: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा आणि पारदर्शक बदल केला आहे. आतापर्यंत ऑनलाइन तात्काळ तिकीट (Online Tatkal Ticket) बुकिंगसाठी लागू असलेला 'OTP' (वन टाइम पासवर्ड) आधारित नियम आता आरक्षण काउंटरवर (Reservation Counter) मिळणाऱ्या तात्काळ तिकिटांसाठीही (Tatkal Ticket) लागू होणार आहे.

तात्काळ तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यासाठी रेल्वेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे गरजू प्रवाशांना तिकीट मिळणे अधिक सोपे होईल आणि गैरप्रकारांना आळा बसेल. येत्या काही दिवसांत ही नवीन व्यवस्था सर्वत्र लागू होण्याची शक्यता आहे.

काय आहे निर्णय?

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगची व्यवस्था अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ऑनलाइन तिकिटांनंतर, आता रेल्वे आरक्षण काउंटरवरून तात्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनाही OTP आधारित प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. 

( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
 

म्हणजेच, आता कोणताही प्रवासी काउंटरवरून तात्काळ तिकीट बुक करेल तेव्हा, तिकीट फॉर्ममध्ये दिलेल्या त्याच्या मोबाईल नंबरवर एक OTP (वन टाइम पासवर्ड) पाठवला जाईल. तिकीट कन्फर्म होण्यासाठी, प्रवाशाला काउंटरवर हा योग्य OTP सांगावा लागेल.

Advertisement

OTP प्रणालीची अंमलबजावणी

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन नियमामुळे तात्काळ तिकिटांचा गैरवापर थांबवता येईल आणि खऱ्या गरजू प्रवाशांना तिकीट सहज उपलब्ध होईल. रेल्वे तिकीट बुकिंगला अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने हा एक मोठा बदल आहे.

या व्यवस्थेची चाचणी (ट्रायल) 17 नोव्हेंबर 2025 पासूनच सुरू करण्यात आली होती. सध्या ही प्रणाली 52 ट्रेन्समध्ये लागू झाली आहे आणि आता ती पूर्णपणे सर्व ट्रेन्समध्ये लागू करण्याची तयारी रेल्वेने केली आहे.

Advertisement


तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये रेल्वेने एका रात्रीत हा बदल केलेला नाही, तर हे नियम अनेक टप्प्यांमध्ये लागू करण्यात आले आहेत.

 जुलै 2025 ऑनलाइन तात्काळ तिकिटांसाठी आधार आधारित पडताळणी (Aadhaar Based Verification) सुरू करण्यात आली होती.
ऑक्टोबर 2025  ऑनलाइन सामान्य तिकिटांसाठी (Online General Tickets) पहिल्या दिवशीच्या बुकिंगवर OTP प्रणाली लागू करण्यात आली.
28 ऑक्टोबर 2025 पासून IRCTC च्या माध्यमातून सकाळी 8 ते 10 या वेळेत तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) अनिवार्य करण्यात आले आहे. IRCTC नुसार, तिकीटांची मागणी सर्वाधिक असते त्याच वेळेत (सकाळचे 8 ते 10) हा नियम लागू राहील, म्हणजेच याच वेळेत आधार पडताळणी झालेले युजर्सच तिकीट बुक करू शकतील.


ऑनलाइन आणि काउंटर अशा दोन्ही ठिकाणी ही OTP प्रणाली लागू केल्यामुळे बुकिंगमध्ये अधिक पारदर्शकता वाढली आहे आणि प्रवाशांनी या दोन्ही सुधारणा सहज स्वीकारल्या आहेत.

Topics mentioned in this article