Railway News: रेल्वेचा कडक नियम! स्क्रीनशॉट, WhatsApp, PDF तिकीट चालणार नाही; कोणते तिकीट VALID? जाणून घ्या

व्हॉट्सॲपद्वारे तिकीट दाखवणे वैध नाही. ते यापुढे तिकीट म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. रेल्वेने माहिती दिली आहे की व्हॉट्सॲपद्वारे तिकीट दाखवणे पुरेसे नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Indian Railway Ticket New Rule:  भारतीय रेल्वेने डिजिटल तिकिटांचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकजण व्हॉट्सॲपवर आलेले तिकीट किंवा स्क्रिनशॉट दाखवतात. मात्र यापुढे अशा प्रकारची तिकीटे मान्य केली जाणार आहेत. अधिकृत रेल वन ऍपवरुन काढलेले तिकीटच ग्राह्य धरले जाणार असल्याचा नियम रेल्वे प्रशासनाने केला आहे. 

Pune Palkhi Sohla: पुणे मनपाकडून गोरगरीब वारकऱ्यांची लूट, धक्कादायक प्रकार समोर, मोफत सेवेचा दावाही खोटा

स्क्रीनशॉट, WhatsApp, PDF तिकीट चालणार नाही..!

रेल्वे प्रवासादरम्यान अनेक लोक त्यांच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सॲपद्वारे तिकीट दाखवतात. मात्र यापुढे हे बेकायदेशीर मानले जाईल. रेल्वेने अनारक्षित तिकिटांसंदर्भात महत्त्वाचे नियम आणि कायदे स्पष्ट केले आहेत, त्यानुसार व्हॉट्सॲपद्वारे तिकीट दाखवणे वैध नाही. ते यापुढे तिकीट म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. रेल्वेने माहिती दिली आहे की व्हॉट्सॲपद्वारे तिकीट दाखवणे पुरेसे नाही.

Advertisement

शिवाय इतर माध्यमांद्वारे शेअर केलेली अनारक्षित तिकिटे प्रवासासाठी वैध नाहीत. हे विशेषतः RailOne ॲपद्वारे बुक केलेल्या तिकिटांना लागू होते. प्रवासादरम्यान तुम्ही फक्त RailOne ॲपद्वारे बुक केलेले तिकीटच दाखवले पाहिजे. रेल्वेने म्हटले आहे की, जर तुम्ही RailOne ॲपद्वारे अनारक्षित तिकीट बुक केले, तर तुम्ही प्रवासादरम्यान नोंदणी केलेला मोबाईल नंबर सोबत बाळगला पाहिजे.

सोबतच तुम्ही एक वैध फोटो ओळखपत्रही सोबत बाळगले पाहिजे. व्हॉट्सॲपद्वारे तिकिटाचा स्क्रीनशॉट किंवा प्रवासादरम्यान तिकिटाचा स्क्रीनशॉट दाखवणे वैध मानले जाणार नाही. असा प्रकार आढळल्यास प्रवाशांवर दंड आकारला जाऊ शकतो किंवा इतर कारवाई केली जाऊ शकते. व्हॉट्सॲपवर तिकीट किंवा स्क्रीनशॉट दाखवून फसवणुकीचे व्यवहार केले जाऊ शकतात, त्यामुळे रेल्वेने ही कारवाई केली आहे. हे टाळण्यासाठी, ॲपवर तिकीट आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एकत्र असणे आवश्यक आहे.

Solapur News: 115 वर्षांचा लढा संपला! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक निर्णय, विधानसभेत मोठी घोषणा; 9000 कुटुंबांना..