दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची बातमी, पुढे काय झालं?

दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2211मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

Advertisement
Read Time: 2 mins

दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर रनवेवरच विमान थांबवण्यात आले. त्वरित कारवाई करून सर्वप्रथम फ्लाइटमधील प्रवाशांना इमरजेंसी एक्झिटने सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. यानंतर सुरक्षा तपासणीकरिता विमान तातडीने आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. यासोबतच सुरक्षा दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये विमानामध्ये काहीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. 

(नक्की वाचा: चक्क पोलिसांनाच झेड प्लस सुरक्षा देण्याची अजब मागणी, नक्की प्रकार काय?)

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट 6E2211ने दिल्लीहून वाराणसीकडे जाण्यासाठी उड्डाण भरण्याच्या तयारीत होते. तेव्हाच विमानामध्ये बॉम्ब असल्याचे वृत्त मिळाले. खबरदारी म्हणून सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या विमानातून बाहेर काढण्यात आले. पहाटे 5.35 वाजण्याच्या सुमारास विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली, यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रवाशांना सुखरूप विमानाबाहेर काढले. दरम्यान इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. 

(नक्की वाचा: वडील मोबाइल रीचार्ज करण्यासाठी गेले, पण घरी आला त्यांचा मृतदेह)


दिल्लीतील शाळा आणि हॉस्पिटलमध्येही बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर हॉस्पिटलमध्ये आणि आता इंडिगो विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली.  

Advertisement

(नक्की वाचा: गर्भपातादरम्यान मृत्यू, कारमधून महिलेचा मृतदेह शहरभर फिरवला; भयंकर प्रकार पाहून पोलिसही हादरले!)