Indigo Flight Cancellations : तुमची इंडिगो फ्लाईट उशिरा किंवा कॅन्सल? 'या' सोप्या पद्धतीने मिळवा संपूर्ण पैसे

Indigo Flight Cancellations : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, मुंबई आणि बंगळूरू यांसारख्या प्रमुख विमानतळांवर इंडिगोच्या शेकडो फ्लाईट्स रद्द झाल्या (IndiGo Flight Cancellation) आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Indigo Flight Cancellations : तुमच्या फ्लाईटला उशिर झाला असेल किंवा रद्द झाली असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही.
मुंबई:

Indigo Flight Cancellations : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, मुंबई आणि बंगळूरू यांसारख्या प्रमुख विमानतळांवर इंडिगोच्या शेकडो फ्लाईट्स रद्द झाल्या (IndiGo Flight Cancellation) आहेत. अनेक प्रवाशांना याचा फटका बसला आहे. तुमच्या फ्लाईटला उशिर झाला असेल किंवा रद्द झाली असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही अशा परिस्थितीत संपूर्ण रिफंड किंवा फ्लाईट री-शेड्युलिंग हे दोन्ही पर्याय सहजपणे निवडू शकतात. इंडिगोकडून पूर्ण रिफंड कसा आणि कधी मिळू शकतो किंवा फ्लाईट कशी री-शेड्युल करायची, याची सविस्तर  आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे संपूर्ण पद्धत?

प्रवाशांनी रिफंड मिळवण्यासाठी किंवा फ्लाईट बदलण्यासाठी इंडिगोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि खाली स्क्रोल करावे. तिथे त्यांना "सपोर्ट" (Support) हा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक केल्यानंतर "प्लॅन बी" (Plan B) हा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय प्रवाशांना फ्लाईट बदलणे, तिकीट रद्द करणे आणि रिफंड मिळवणे अशा सुविधा देतो.

'प्लॅन बी' निवडल्यानंतर, प्रवाशांना त्यांचा PNR/बुकिंग नंबर आणि ईमेल आयडी/अंतिम नाव (Last Name) ही माहिती भरावी लागते. त्यानंतर त्यांना दोन पर्याय उपलब्ध होतात: फ्लाईट री-शेड्युल करणे किंवा फ्लाईट रद्द करून रिफंड घेणे. प्रवाशी त्यांची गरज लक्षात घेऊन नवीन तारीख किंवा नवीन वेळ निवडू शकतात किंवा फ्लाईट रद्द करून त्यांचे पैसे परत घेऊ शकतात.

( नक्की वाचा : Flights Tickets : विमानाच्या तिकीटांची मनमानी भाडेवाढ थांबणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाचा सर्व नियम )

रिफंडची विनंती यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, सामान्यतः 7 वर्किंग डे मध्ये रिफंडची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जाते.  तुम्ही फ्लाईटचे तिकीट कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीमार्फत बुक केले असेल, तर रिफंड मिळवण्यासाठी त्यांनी त्याच एजन्सीशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

सरकारनं डोळे वटारताच इंडिगो कामाला....

दरम्यान, सरकारने दिलेल्या कडक सूचनांनंतर इंडिगोने रिफंडची प्रक्रिया जलद सुरू केली आहे. कंपनीने आतापर्यंत 610 कोटी रुपये इतके रिफंड जारी केले आहेत. याव्यतिरिक्त, रद्द झालेल्या किंवा खूप उशिरा झालेल्या फ्लाईट्सच्या बाबतीत री-शेड्युलिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क (additional charge) घेतले जाणार नाहीत. असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांना त्वरित मदत करण्यासाठी कंपनीने स्पेशल सपोर्ट सेल्स (Special Support Cells) देखील तयार केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशभरातील प्रवाशांचे सुमारे 3,000 गहाळ झालेले बॅग्स त्यांना परत पोहोचवण्यात आले आहेत.

Advertisement