पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! 227 प्रवाशांचा जीव होता धोक्यात तरीही नाकारली लँडिंगची परवानगी

Indigo flight emergency landing : बुधवारी (21 मे) श्रीनगरमध्ये इंडिगोच्या ज्या विमानाची आपत्कालीन लँडिंग झाली, त्या विमानाने आपत्कालीन स्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी मागितली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IndiGo Delhi-Srinagar Flight: पाकिस्ताननं पुन्हा एकदा त्यांचा खरा चेहरा दाखवला आहे. बुधवारी (21 मे) श्रीनगरमध्ये इंडिगोच्या ज्या विमानाची आपत्कालीन लँडिंग झाली, त्या विमानाने आपत्कालीन स्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, आपत्कालीन स्थिती असूनही पाकिस्तानने भारतीय विमानाला त्यांच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी नाकारली. या विमानात 227 प्रवासी होते. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे श्रीनगरमध्ये यशस्वीरित्या आपत्कालीन लँडिंग केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आपत्कालीन लँडिंगनंतर विमानाची अवस्था दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते पाहून एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली असेच म्हणावे लागेल. दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाला बुधवारी अचानक गारपिटीचा सामना करावा लागला, ज्यामुळे विमानाचे पुढचे टोक (नोज) तुटले होते.

पाकिस्तानने नाकारली मदत

वैमानिकाने  सुरुवातीला लाहोर हवाई वाहतूक नियंत्रणाकडे (ATC) ही परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी मागितली, तेव्हा त्यांनी हा विनंती नाकारली, अशी माहिती सूत्रांनी  दिली. नागरी उड्डाण महासंचालनालयामार्फत (DGCA) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 

( नक्की वाचा : Indigo Flight : गारपीटीमुळे इंडिगोचे विमान हवेत थरारले, समोरचा भाग तुटला! पाहा थरकाप उडवणारा Video )
 

प्रवाशांनी अनुभवला थरार

बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांसह 220  पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान अचानक गारपिटीच्या तडाख्यात सापडले आणि वैमानिकाने श्रीनगर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रणाला 'आपत्कालीन' स्थितीची माहिती दिली. मात्र, नंतर हे विमान सुरक्षितपणे उतरले.

Advertisement

सूत्रांनी सांगितले की, बुधवारी जेव्हा विमान अमृतसरवरून उड्डाण करत होते, तेव्हा वैमानिकाने विमान हवामानामुळे प्रतिकूल स्थितीत असल्याचे पाहिले. त्यांनी लाहोर हवाई वाहतूक नियंत्रणाकडे पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी मागितली. ही परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची विनंती करण्यात आली, परंतु लाहोर एटीसीने ती नाकारली.

परवानगी न मिळाल्याने विमानाला त्याच मार्गावरून पुढे जावे लागले, जिथे विमानाला हवेतील तीव्र झटके आणि गारपिटीचा सामना करावा लागला.

भारत-पाकिस्तान संबंधांचा परिणाम

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे, शेजारच्या देशाने त्यांची हवाई हद्द भारतीय विमान कंपन्यांसाठी बंद केली आहे. भारतानेही पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद ठेवली आहे.

Advertisement

इंडिगोने बुधवारी एका निवेदनात म्हटले होते की, दिल्लीहून श्रीनगरला जाणारे त्यांचे 6E2142 हे विमान मार्गात अचानक गारपिटीच्या तडाख्यात सापडले. विमान कंपनीने सांगितले की, "विमान आणि कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन केले आणि विमान श्रीनगरमध्ये सुरक्षितपणे उतरवले."

Topics mentioned in this article