Indigo Flight Emergency Landing in Srinagar: जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे इंडिगोच्या एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंडिगोच्या फ्लाइट 6E2142 ला खराब हवामानामुळे आणीबाणी लँडिंग करावे लागले. त्यावेळी विमानात 227 प्रवासी होते. खराब हवामान आणि गारपिटी दरम्यान पायलटनी कंट्रोल रूमला आपत्कालीन स्थितीची माहिती दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यानंतर हे विमान सायंकाळी 6.30 वाजता श्रीनगरमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सर्व एअरक्रू आणि प्रवासी सुरक्षित आहेत आणि एअरलाइनने या फ्लाइटला AOG (एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड) घोषित केले आहे. विमानाच्या समोरील भागाला (नोझ) नुकसान झाले आहे, त्याचे फोटोही समोर आली आहेत.
इंडिगोने जारी केले निवेदन
इंडिगोने एक निवेदन जारी करून सांगितले की, 'दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे फ्लाइट 6E 2142 ला प्रवासादरम्यान अचानक गारपिटीचा सामना करावा लागला. फ्लाइट आणि केबिन क्रूने निर्धारित नियमांचे पालन केले आणि विमान श्रीनगरमध्ये सुरक्षितपणे उतरवले. विमान पोहोचल्यानंतर विमानतळ टीमने प्रवाशांची काळजी घेतली. आवश्यक तपासणी आणि दुरुस्तीनंतर विमान पुढील प्रवासासाठी तयार केले जाईल.
( नक्की वाचा : Amrit Stations : PM मोदी देणार देशाला मोठी भेट, 103 रेल्वे स्टेशनवर मिळणार विमानतळासारख्या सुविधा )
श्रीनगरमध्ये आणीबाणी लँडिंग झालेल्या फ्लाइटचा पुढील भाग (नोझ) खराब झाला आहे, ज्याची छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांवरूनच हे स्पष्टपणे समजू शकते की विमानाच्या बाबतीत काय घडले असेल.