शाळा संचालकाच्या बायकोचे बस चालकाशी लफडे! नवऱ्यावर सोडला विषारी साप, सिया, मुस्कानपेक्षा भयंकर निघाली दामिनी

School director snake murder case: . एका खासगी स्कूल संचालकाच्या पत्नीने आपल्याच स्कूल बस चालकासोबत सूत जमवले आणि त्यानंतर ...

जाहिरात
Read Time: 3 mins
कारस्थानी दामिनीनं थेट विषारी सापाचा वापर करून पतीचा गेम केला.
मुंबई:

School director snake murder case: सात जन्माच्या आणाभाका घेऊन संसार थाटलेल्या एका पत्नीने पैशांच्या हव्यासापोटी आणि अनैतिक संबंधांच्या  आड येणाऱ्या आपल्याच पतीचा ज्या क्रूर पद्धतीने काटा काढला, ते ऐकून संपूर्ण पोलीस दलही चक्रावून गेले आहे. एका खासगी स्कूल संचालकाच्या पत्नीने आपल्याच स्कूल बस चालकासोबत सूत जमवले आणि त्यानंतर पतीला कायमचे रस्त्यातून हटवण्यासाठी एक अशी भयंकर योजना आखली जी ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. 

नवऱ्याची  हत्या केल्यानंतर त्याची 20 लाख रुपये विम्याची रक्कमही हडप करता येईल आणि प्रियकरही आपलाच होईल, असा दुहेरी डाव या महिलेने खेळला होता. एका अपघातातून पती सुदैवाने वाचल्यानंतर, या कारस्थानी महिलेने थेट एका विषारी सापाचा वापर करून पतीचा गेम केला.

Advertisement

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेश मधील मेरठ येथील हस्तिनापुर भागात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे कृष्णा किड्स प्ले स्कूलचे संचालक अतुल पंवार यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अतुल पंवार यांची पत्नी दामिनी हिचे त्यांच्याच स्कूलचा बस चालक तुषार उर्फ निक्की याच्यासोबत अनैतिक संबंध सुरू होते. 

नवऱ्याला वाटेतून दूर करण्यासाठी दामिनीने तुषारच्या मदतीने पहिल्यांदा एका रस्ता अपघातात अतुल यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आले. त्यानंतर दामिनीने एक अत्यंत थरारक स्क्रिप्ट तयार केली. तिने आधी नवऱ्याच्या दुधात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि नंतर प्रियकराने आणलेला एक जिवंत विषारी साप पतीच्या अंगावर सोडला. सापाने अतुल यांना डसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )

अनैतिक संबंध आणि विम्याच्या 20 लाखांचा खेळ

अतुल पंवार यांचा मृतदेह सकाळी घराबाहेर खाटेवर आढळून आला आणि त्यांच्या पायावर सापाच्या दंशाच्या खुणा होत्या. चादर बाजूला करताच तिथे सापही दिसल्याने सुरुवातीला सर्वांना ही सापाच्या चावण्याने झालेली एक सामान्य आणि नैसर्गिक दुर्घटना वाटली. मात्र, पोलीस तपासात काही गोष्टी खटकल्यामुळे जेव्हा अतुल यांच्या पत्नीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स खंगाळण्यात आले, तेव्हा अनैतिक संबंधांचे एक भयानक जाळे समोर आले. 

दामिनीचा प्रियकर असलेला तुषार हा स्वतः विवाहित असून तो आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याच्या तयारीत होता. दामिनीने आणि तुषार या दोघांनाही पतीला मारून विम्याचे 20 लाख रुपये लाटायचे होते आणि एकत्र संसार थाटायचा होता.

Advertisement

( नक्की वाचा : चिता जळण्यापूर्वी प्रियकराने मंगळसूत्र घालावं! मुंबईच्या IT इंजिनिअरची शेवटची इच्छा, संपूर्ण गावात पेटला वाद )
 

या संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश करताना मेरठचे एसएसपी यांनी सांगितले की, दामिनीने अत्यंत थंड डोक्याने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता. यापूर्वी अशाच प्रकारची एक गुन्हेगारी घटना याच भागात घडली होती, ज्याची पुनरावृत्ती दामिनीने केली. 

या खळबळजनक खुनाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पत्नी दामिनी आणि तिचा प्रियकर बस चालक तुषार या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. एका शालेय संचालकाची त्याच्याच पत्नीने बस चालकाच्या मदतीने केलेली ही निर्घृण हत्या सध्या संपूर्ण परिसरात प्रचंड चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरली आहे.

Advertisement