Jawaharlal nehru: हनीट्रॅपबाबतची भन्नाट गोष्ट, पंडीत नेहरूंनाही आवरले नव्हते हसू, काय आहे तो किस्सा?

नेहरूंनी राजदूताला भविष्यात अधिक सावध राहण्याचा इशारा दिला. पण कोणतीही कठोर कारवाई केली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

हनीट्रॅपबद्दल तुम्ही अनेकदा अनेक किस्से  ऐकले असतील. भारत-पाकिस्तान संघर्षानंतर हनीट्रॅप हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे अलीकडेच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली काही जणांना अटक झाली आहे. हनीट्रॅप हे एक असं ट्रॅप आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला रोमँटिक किंवा इतर कोणत्याही प्रलोभनात अडकवून त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळवली जाते.  शिवाय या ट्रॅपच्या माध्यमातून त्यांना काही काम करण्यास भाग पाडले जाते. हनीट्रॅप हा हेरगिरी आणि गुप्त ऑपरेशन्ससाठी वापरले जाणारे प्रभावी साधन आहे. जेव्हा संपूर्ण देशात हनीट्रॅपची चर्चा होत आहे, तेव्हा इतिहासातील तो जुना किस्सा आठवतो, जेव्हा माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूही हनीट्रॅपबद्दल ऐकून हसले होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारतीय गुप्तचर इतिहासात अनेक वेळा हेरगिरी आणि हनीट्रॅपची प्रकरणे समोर आली आहेत. पण एक असा किस्सा आहे जो ऐकून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हसले होते. हा किस्सा आहे एका भारतीय राजदूताचा. जो मॉस्कोमध्ये रशियन गुप्तहेरांच्या हनीट्रॅपमध्ये फसला होता. चला, या मनोरंजक किस्स्याबद्दल जाणून घेऊया. जेव्हा जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते, तेव्हा एक तरुण भारतीय राजदूत मॉस्कोमध्ये कार्यरत होता. या राजदूताची ओळख एका रशियन युवतीशी झाली. जी प्रत्यक्षात सोव्हिएत संघाच्या गुप्तचर संस्था केजीबी (KGB) ची एजंट होती. यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. केजीबीने या नात्याचा फायदा घेण्याची योजना आखली होती.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - jyoti malhotra: 'दिल्लीला जाते असं सांगून ती...', ज्योतीच्या वडिलांचा लेकीच्या पाक कनेक्शनबाबत मोठा खुलासा

केजीबीने राजदूताच्या खासगी क्षणांचे फोटो काढले होते. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. फोटो दाखवून त्याच्याकडून गोपनीय माहिती मागितली गेली. त्यातून भारताचे राजकीय डावपेच काय आहेत याची माहिती रशियाला मिळवायची होती. पण राजदूताने हिंमत दाखवली. त्याने त्वरित आपल्या दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा हे प्रकरण भारतीय दूतावासाच्या राजदूतांपर्यंत पोहोचले.त्यांनी ते पंडीच नेहरूंना सांगितले. नेहरू पूर्ण गोष्ट ऐकून जोरजोरात हसले. नेहरूंनी राजदूताला भविष्यात अधिक सावध राहण्याचा इशारा दिला. पण कोणतीही कठोर कारवाई केली नाही. ही घटना भारतीय गुप्तचर इतिहासात एका मजेदार किस्सा म्हणून नोंदली गेली.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Who is Priyanka Senapati: देशद्रोही ज्योतीसोबत पाकिस्तानची सफर, आणखी एक युट्यूबर तपास यंत्रणांच्या रडारवर

सध्या पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे. या शिवाय  युट्यूबर प्रियंका सेनापती हिची ही चौकशी केली जात आहे. ती ज्योतीची मैत्रिण होती. पोलिसांकडून त्यांचे संबंध आणि कोणत्याही प्रकारचा सहभाग तपासत आहेत. पुरी शहर डीएसपीच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने प्रियांकाच्या घरावर छापा टाकला आणि झडती घेतली होती. ज्योती मल्होत्राचा हेरगिरीमध्ये सहभाग असल्याचे मोठे पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हेरगिरी आणि हनिट्रॅपचा विषय चर्चेला आला आहे.  
 

Advertisement