IPL 2025 : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅच रद्द! धरमशालामध्ये सुरु होता सामना

धरमशालामध्ये सुरु असलेली पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) ही मॅच थांबवण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान या सीमा भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. गुरुवारी रात्री (8 मे 2025) पाकिस्तानं हा हल्ला केला. भारतानं या हल्ल्याला चोख उत्तर दिलं. सर्व भागातील हल्ले निष्फळ ठरवले. या सर्व घडामोडीचे पडसाद आयपीएल 2025 वरही पडले आहेत. 

धरमशालामध्ये सुरु असलेली पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) ही मॅच थांबवण्यात आली आहे. ही मॅच पावसामुळे उशीरा सुरु झाली होती. या मॅचमध्ये पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 

पंजाब किंग्जची बॅटिंग सुरु असताना ही मॅच थांबवण्यात आली आहे. मॅच थांबवण्यात आली त्यावेळी पंजाबचे 10.1 ओव्हर्समध्ये 1 आऊट 122 रन्स केले होते. त्यानंतर अपुऱ्या विद्युतपुरवठ्यामुळे ही मॅच थांबवण्यात आली आहे. 

( नक्की वाचा : Big News : पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारतानं परतवला, जम्मू ते जैसलमेरपर्यंत चोख उत्तर )

मुंबई इंडियन्सच्या मॅचचं ठिकाण बदललं

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर  11 मे रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Mumbai Indians vs Punjab Kings) मॅचचं ठिकाण बदलण्यात आलं आहे.

Advertisement

नियोजित वेळापत्रकानुसार हा सामना हिमाचल प्रदेशातील धरमशालामध्ये होणार होता. पण, सुरक्षेच्या कारणामुळे तेथील विमानतळ बंद करण्यात आलंय. त्यामुळे हा सामना आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी ही माहिती पीटीआयला दिली आहे. ही मॅच दुपारी खेळली जाणार आहे. बीसीसीआयनं याबाबत आम्हाला विनंती केली होती. ती विनंती आम्ही मान्य केली आहे. मुंबई इंडियन्सची टीम आज उशीरा इथं दाखल होईल. पंजाब किंग्जच्या आगमनाबाबत माहिती नंतर देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

Advertisement
Topics mentioned in this article