IRCTC नं तिकीट बुक करताना कधीही करु नका ही चूक, अन्यथा होईल जेल!

IRCTC च्या माध्यमातून तिकीट बुक केल्यानंतर रेल्वेचा हा नियम मोडल्यास तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकतं.

Advertisement
Read Time: 2 mins
I
मुंबई:

सध्या बहुतेक जण ऑनलाईन तिकीट बुक (Online Train Ticket Booking) करण्यासाठी IRCTC ची वेबसाईट आणि अ‍ॅपचा वापर करतात. या माध्यमातून तुम्ही तुमचा प्रवास तुमच्या सोयीनुसार घरात बसून प्लॅन करु शकता. रेल्वेचं तिकीट बुक करु शकता. पण, IRCTC च्या वैयक्तिक आयडीवरुन किती तिकीट बुक (IRCTC Train Ticket Booking) करता येतात याची अनेकांना माहिती नसते. IRCTC च्या वैयक्तिक आयडीवरुन तिकीट बुक केल्यानं जेलमध्ये जावं लागू शकतं? तुम्ही IRCTC च्या वैयक्तिक आयडीवरुन तिकीट बुक करुन तुम्ही ते विकू शकता का? याची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आम्ही तुम्हाला IRCTC च्या माध्यमातून तिकीट बुकिंग (Train Ticket Booking Online) करण्याचे नियम सांगणार आहोत. हे नियम तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. IRCTC च्या या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. 

सर्वात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की, तुम्ही IRCTC चे युझर असाल तर तुमच्या वैयक्तिक आयडीवरुन फक्त स्वत:चं नाही तर तुमचे कुटुंबीय तसंच मित्रांची तिकीटंही बुक करु शकता. 

( नक्की वाचा : रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम )
 

दर महिन्याची मर्यादा किती?

रेल्वेच्या नियमानुसार दर महिन्याला युझर IRCTC  पर्सनल आयडीवरुन दर महिन्याला कमाल 12 तिकीटं बुक (IRCTC ticket booking limit)  करु शकतो. त्यासाठी युझरचा IRCTC आयडी  आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. 

Advertisement

...तर होईल जेल!

रेल्वे एक्ट 1989 मधील सेक्शन 143 नुसार तुम्ही आयआरसीटीसीचे अ‍ॅप किंवा वेबसाईटवर तुमच्या वैयक्तिक आयडीवरुन ऑनलाईन तिकीट खरेदी केलं आणि ते विकताना आढलला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. तुम्ही तुमच्या पर्सनल आयडीनं तिकीट बुकिंगचा व्यवसाय करु शकत नाही. तसं केलं तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. अर्थात मित्र आणि कुटुंबीयांसाठी तिकीट बुक करण्यावर काहीही बंधन नाही.