जाहिरात

'भगवान श्रीकृष्ण मुस्लीम, दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे!' मौलाना जार्जिस यांचं वादग्रस्त वक्तव्य, पाहा VIDEO

Maulana Jarjis Ansari controversial speech: भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल एका इस्लामी विद्वानाने केलेल्या दाव्यामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार वाद पेटला आहे.

'भगवान श्रीकृष्ण मुस्लीम, दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे!' मौलाना जार्जिस यांचं वादग्रस्त वक्तव्य, पाहा VIDEO
Maulana Jarjis : मौलानांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई:

Maulana Jarjis Ansari controversial speech: भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल एका इस्लामी विद्वानाने केलेल्या दाव्यामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार वाद पेटला आहे. झारखंडमधील एका धार्मिक मंचावरून बोलताना मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण हे वास्तविक मुस्लीम होते आणि ते दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे, असा अजब दावा केला आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदू धार्मिक नेते आणि संतांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळत आहे. अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून, देशात आधीच कृष्ण जन्मभूमीच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना या नवीन विधानामुळे वातावरणात अधिकच तणाव निर्माण झाला आहे.

काय म्हणाले मौलाना?

हा संपूर्ण वाद मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झाला आहे. या व्हिडिओमध्ये मौलाना सनातन धर्माचा पवित्र ग्रंथ असलेल्या भगवद्गीतेच्या 6 व्या अध्यायातील 10 व्या श्लोकाचा संदर्भ देत आहेत. या श्लोकाचा स्वतःचा अर्थ लावताना त्यांनी असा दावा केला की, त्यात वर्णन केलेले ध्यान आणि आध्यात्मिक साधना ही वास्तविक नमाज पठणच आहे. 

मौलाना एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भगवान श्रीकृष्णासोबतच भगवान श्रीरामाबद्दलही असाच दावा केला आहे. या महापुरुषांनी केवळ इस्लामच्या शिकवणीचा प्रसार केला होता, असा अजब दावा मौलानांनी केला आहे.

( नक्की वाचा : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना कोर्टाने थेट श्रीकृष्णाचा दाखला का दिला? वाचा सविस्तर )
 

संतांचा संताप आणि भाजपाचा आक्षेप

मौलानांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर देशातील हिंदू संघटना आणि प्रमुख संतांनी यावर अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सनातन धर्माचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा आणि देशातील जातीय सलोखा बिघडवण्याचा हा एक मोठा कट असल्याचा आरोप संतांनी केला आहे. यासोबतच राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटल्या असून भाजप नेत्यांनी मौलानांच्या या वक्तव्यावर कडक आक्षेप घेतला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मौलानांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

हा वादग्रस्त व्हिडिओ 23 जून, 2026 रोजी झारखंडमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असला तरी तो आता सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. 

( नक्की वाचा : Palghar News : डहाणू ते लंडन लव्ह जिहादचे भयंकर कनेक्शन! हिंदू मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या नेटवर्कची Inside Story )

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याचे रहिवासी असलेले मौलाना जर्जिस अन्सारी हे अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाहीत, यापूर्वीही त्यांची अशी अनेक विधाने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. सध्या देशात कृष्ण जन्मभूमी स्थळावरून न्यायालयीन आणि सामाजिक पातळीवर मोठी चर्चा सुरू असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने वादाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.

इथे पाहा VIDEO

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com