Jaipur Hotel Video: खिडकीत जोडपे बेभान, पाहण्यासाठी पुलावर वाहतुकीचे तुफान

Jaipur Hotel Video:हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जोडपं काय काय करतंय याच्यात भयंकर रस असल्याने पुलावर गर्दी झाली

जाहिरात
Read Time: 2 mins
जयपूर:

Jaipur Hotel Viral Video: जेसीबीद्वारे खोदकाम असो अथवा रस्त्यात होत असलेली हाणामारी असो; भारतामध्ये लोकांना असल्या गोष्टी थांबून बघण्यात फार रस असतो. मुंबईसारख्या शहरात गाडी किती वाजता येणार हे माहिती असतानाही अनेकजण डोकावून गाडी येतेय की नाही हे पाहात असतात. ही डोकवाडोकवी ट्रॅफीक जामला आमंत्रण देणारी ठरली आहे. ()Why did a crowd gather outside a Jaipur hotel?)ही घटना जयपूरची असून इथल्या सिव्हिल लाइन्स भागामध्ये एक तारांकीत हॉटेल आहे. या हॉटेलवरून जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी तोबा ट्रॅफीक जाम झालं होतं. सगळ्यांच्या नजरा या हॉटेलकडे लागल्या होत्या. या नजरा हॉटेलच्या एका विशिष्ट खोलीकडे लागल्या होत्या. या रुमच्या वरच्या रुममध्ये राहणारे खिडीतून बाहेरच्या ट्रॅफीककडे पाहून आश्चर्य व्यक्त करत होते. आपल्या रुमच्या खालच्या रुममध्ये काय चाललंय याची त्यांना कल्पनाही नव्हती. 

नेमकं झालं तरी काय?  (What happened at the Jaipur hotel with the couple?)

सदर प्रकार हा मंगळवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॉटेललालागून एक फ्लायओव्हर ब्रीज असून या ब्रीजवर हॉटेलमध्ये चांगलेला प्रकार पाहण्यासाठी गर्दी झाली होती. एवढी लोकं काय पाहातायत याची उत्सुकता निर्माण झाल्याने अजून लोकं इथे थांबू लागली होती. यातल्या काहींनी मोबाईल काढून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. सगळी लोकं आपल्या दिशेने का बघतायत हे हॉटेलमध्ये राहणाऱ्या काही मंडळींना कळालं नव्हतं. 

Advertisement

बघे का जमले ? (How did the Jaipur hotel video cause a traffic jam?)

या हॉटेलच्या एका खोलीमध्ये एक जोडपं होतं. ते आपल्या कामक्रीडेमध्ये मग्न झालं होतं. आनंद लुटण्याच्या नादात हे जोडपं पडदा बंद करणं विसरलं होतं. हे सगळं बाहेरून दिसत असल्याने लोकं नेमकं चाललंय तरी काय हे पाहण्यासाठी ब्रीजवर जमू लागले होते. इथे इतकी गर्दी का झालीय हे बघण्यासाठी आणखी काही लोकं जमा झाली आणि मग ही साखळी सुरूच राहिली. काहींनी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला.  

Advertisement

पुलावर वाहतूक कोंडी

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जोडपं काय काय करतंय याच्यात भयंकर रस असल्याने पुलावर गर्दी झाली आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.  गर्दीतल्या काहींनी व्हिडीओ काढून व्हायरल केल्यानंतर काही माध्यमांनी हॉटेल प्रशासनाशी संपर्क साधला. यावर हॉटेल प्रशासनाने अशा घटनेची आणि व्हिडीओची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले.  

Advertisement