Jharkhand News: शाळेत 100 विद्यार्थिनींना शर्ट काढायला लावले,फक्त ब्लेजरवर घरी पाठवलं; पालकांचा संताप

एकमेकांच्या शर्टवर ते संदेश लिहून निरोप देत होते. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिका एम. देवश्री विद्यार्थिनींच्या या कृतीवर आक्षेप घेत संदेश लिहलेले शर्ट काढायला लावले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

झारखंडमधील एका शाळेमध्ये तब्बल 100 हून अधिक विद्यार्थिनींना शर्ट काढायला लावल्याचा तसेच त्यांना फक्त ब्लेजरवर घरी पाठवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी या विद्यार्थिनींना ही शिक्षा दिल्याचं सांगण्यात येत असून या प्रकारानंतर पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिकेवर 10 वीच्या 100 विद्यार्थिनींना संदेश लिहल्यामुळे त्यांचे शर्ट काढण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तसेच मुख्याध्यापकांनी सर्व मुलींना शर्टशिवाय ब्लेझर घालून घरी परतण्यास भाग पाडले.  त्यानंतर शाळा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. 

 ही घटना शुक्रवारी जोरापोकखर पोलिस स्टेशन हद्दीतील दिगवाडीह येथील एका प्रतिष्ठित शाळेत घडली.  या शाळेतील विद्यार्थ्यांचा गुरुवारी शेवटचा पेपर होता.  परीक्षा दिल्यानंतर, दहावीचे विद्यार्थी एकमेकांच्या शर्टवर संदेश लिहून 'पेन डे' साजरा करत होते. एकमेकांच्या शर्टवर ते संदेश लिहून निरोप देत होते. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिका एम. देवश्री विद्यार्थिनींच्या या कृतीवर आक्षेप घेत संदेश लिहलेले शर्ट काढायला लावले. 

याप्रकरणी मुलींनी त्यांची माफीही मागितली. मात्र तरीही मुख्याध्यापिकांनी सर्व विद्यार्थिनींना शर्टशिवाय ब्लेझर घालून घरी परत पाठवले. सर्वांनी त्यांच्या पालकांना बोलावून प्रत्येकी एक शर्ट मागवा, त्यानंतरच त्यांना शाळा सोडण्याची परवानगी दिली जाईल, असं मुख्याध्यापकांनी सांगितले. त्यामुळे अनेक मुली फक्त ब्लेजर घालून घरी पोहोचल्या. 

नक्की वाचा - BJP News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

मुलींनी आपल्या पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर अनेक पालकांनी मुख्याध्यापिकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात आम्ही काही पीडित मुलींशीही बोललो आहोत. प्रशासन हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती  उपायुक्त माधवी मिश्रा यांनी दिली आहे. 

Advertisement