Kal Bhairav Temple: इथं साक्षात देव पितात दारु ! भक्त पाहात बसतात... रहस्य शोधण्यात वैज्ञानिक हतबल

Kal Bhairav Temple: या मंदिरामध्ये भगवान काल भैरव यांना मदिरा (दारु) चा नैवेद्य दाखवला जातो. विशेष म्हणजे, मूर्ती स्वतः हे पात्र स्वीकारून त्यातील दारु पिऊन टाकते!

जाहिरात
Read Time: 3 mins
Kal Bhairav Temple: भक्त हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होतात. शतकानुशतके हे गूढ कायम आहे.
मुंबई:

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार्मिक नगरी उज्जैन (Ujjain) येथे असलेले काल भैरव मंदिर (Kal Bhairav Temple) हे केवळ श्रद्धेचं केंद्र नाही, तर एका महान आणि न सुटलेल्या रहस्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये भगवान काल भैरव यांना मदिरा (दारु) चा नैवेद्य दाखवला जातो. विशेष म्हणजे, मूर्ती स्वतः हे पात्र स्वीकारून त्यातील दारु पिऊन टाकते!

पात्र आणताच काही क्षणात ते रिकामं होतं आणि भक्त हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होतात. शतकानुशतके हे गूढ कायम आहे. दरवर्षी 12 नोव्हेंबर 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या काल भैरव जयंती (Bhairav Ashtami) निमित्त या चमत्कारी मंदिराच्या रहस्याबद्दल जाणून घेऊया.

महाकालच्या नगरीतील 'कोतवालाचं' गूढ धाम

बाबा महाकालची नगरी असलेल्या उज्जैनमध्ये, पवित्र क्षिप्रा नदीच्या (Shipra River) तीरावर भैरवगड भागात हे प्राचीन काल भैरव मंदिर आहे. याचा उल्लेख आपल्याला स्कंदपुराणाच्या ‘अवंति खंडात' मिळतो.

( नक्की वाचा : Banke Bihari Mandir: 54 वर्षांनंतर उघडला बांके बिहारी मंदिराचा 'गुप्त खजिना'! आत सोने-चांदीचे कलश आणि... )
 

 एका उंच टेकडीवर असलेल्या या मंदिराचे बांधकाम प्राचीन परमार राजांच्या (Parmar Kings) काळात झाले होते. विशाल दगडांचा वापर करून ही अद्भुत रचना उभी करण्यात आली. अशी आख्यायिका आहे की, उज्जैन शहराच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः भगवान महाकालांनी (Mahakal) काल भैरवांना दिली होती. त्यामुळे त्यांना 'महाकालचे कोतवाल' म्हणूनही पूजलं जातं.

दारु पिण्याचं रहस्य आजही कायम

या मंदिराची सर्वात खास आणि आश्चर्यकारक परंपरा म्हणजे भगवान काल भैरवांना मदिरेचा भोग (नैवेद्य) अर्पण करणं. भक्त जसे मदिरेचं भरलेलं पात्र मूर्तीच्या मुखाजवळ आणतात, ते काही क्षणांत पूर्णपणे रिकामं होतं. मदिरा कुठे जाते, हे आजही कोणालाही समजलेलं नाही.

Advertisement

अनेक वैज्ञानिक आणि पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मंदिराच्या संरचनेचा बारकाईने अभ्यास केला. इतकंच नव्हे तर, त्यांनी 12 फूट (12 feet) खोलपर्यंत उत्खननही केलं, पण त्यांना कोणताच ठोस पुरावा मिळाला नाही.

पाताल भैरवी: तंत्र-साधनेचं मुख्य केंद्र

मंदिराच्या आत थोड्याच अंतरावर 'पाताल भैरवी'चं स्थान आहे. इथे एका अरुंद रस्त्यावरून खाली उतरून जाता येतं. असं म्हटलं जातं की, प्राचीन काळात साधक आणि तांत्रिक याच ठिकाणी ध्यान आणि कठोर साधना करत असत.

Advertisement

वळच 'विक्रांत भैरव मंदिर' (Vikrant Bhairav Temple) देखील आहे, जे आजही तांत्रिक साधनेचं (Tantra Sadhana) महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. इथे केलेली कोणतीही साधना अयशस्वी होत नाही, असा भक्तांचा दृढ विश्वास आहे.

काल भैरव आणि तांत्रिक परंपरा

भगवान काल भैरवांची पूजा शैव, कपालिक आणि अघोरा या संप्रदायांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भैरव साधनेत 'पंचमकार' साधनेला विशेष स्थान आहे. यामध्ये 'मदिरा' (सुरा) हे शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे.भैरव साधनेत मदिरा (दारु), मांस (Meat), मत्स्य (Fish), मुद्रा (Gestures) आणि मैथुन (Union) या पाच तत्त्वांचा समावेश असतो. याला भक्ती आणि तंत्राचं गहन दर्शन मानलं जातं.

Advertisement

दरवर्षी भैरव अष्टमी किंवा काल भैरव जयंतीला इथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भक्त आपल्यासोबत दारूची बाटली घेऊन येतात आणि ती भैरव बाबांना अर्पण करतात. मंदिर परिसरात यावेळी अनेक तास लांब रांगा लागतात.

जो भक्त खऱ्या मनाने बाबांना मदिरेचा भोग अर्पण करतो, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी दृढ श्रद्धा आहे. या वर्षी 12 नोव्हेंबर 2025 (बुधवार) रोजी जयंतीच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.
 

Topics mentioned in this article