Kedarnath News: केदारनाथमध्ये मोठा अपघात टळला, हायवेवर हेलीकॉप्टरला करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग, पाहा Video

या हेलिकॉप्टरने बडासू हॅलीपॅडवरून केदारनाथसाठी उड्डाण केले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
केदारनाथ:

आज शनिवार, 7 जून 2025 रोजी केदारनाथमध्ये एक मोठा अपघात टळला. येथे एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला.  त्यामुळे त्याची राष्ट्रीय महामार्गावर इमरजन्सी लँडिंग करावी लागली. यानंतर ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरलं त्या ठिकाणी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. शिवाय रस्त्यावर अचानक हेलिकॉप्टर कसं आलं यामुळे स्थानिकांचीही धावाधाव झाली. मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी मदतीचा हात पुढे केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरने बडासू हॅलीपॅडवरून केदारनाथसाठी उड्डाण केले होते. त्यात पायलटसह एकूण सहा जण होते. या अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. इतर सर्व जण पूर्णपणे सुरक्षित आहेत. सूत्रांनुसार, या अपघाताचे मुख्य कारण नियमांकडे दुर्लक्ष करणे हे सांगितले जात आहे. मात्र याबाबत अजूनही चौकशी सुरू आहे. केदारनाथमध्ये जाणाऱ्या भाविकांनी सध्या मोठी गर्दी केली आहे. त्यात काही जण चालत जाणे पसंत करतात तर काही जण हेलिकॉप्टरचा वापर करतात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune News: मुलगी झाली म्हणून विवाहितेला 15 दिवस उपाशीपोटी डांबलं, पुढे जे काही घडलं ते...

गेल्या महिन्यातही केदारनाथमध्ये लँडिंग करताना एका हेलिकॉप्टरचा मागील भाग तुटला होता. सुदैवाने, हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांना कोणतीही इजा झाली नव्हती. ते सर्व सुरक्षित होते. ज्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली होती, ते ऋषिकेश एम्सचे होते. ते एका रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला पोहोचले होते. परंतु, हेलिपॅडपासून  20 किलोमीटर आधी त्याची आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती. त्याच वेळी विमान अनियंत्रित होऊन खाली पडले. त्याचा मागील भाग तुटला होता. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world