Kolkata Case: कोलकाताच्या 'निर्भया'ला न्याय मिळाला! आरोपी संजय रॉयला जन्मठेप

आरोपी संजय रॉयला दोषी ठरवल्यानंतर आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. . कोलकत्ताचे न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

RG Car Collage Murder Case:  पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला दोषी ठरवल्यानंतर आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. . कोलकत्ताचे न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोलकात्यातील आर जी कर बलात्कार आणि हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. रुग्णालयातल्या महिला निवासी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी संजय रॉयला कोलकात्यातल्या सियालदाह जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले. त्यानंतर आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

संजय रॉयला सियालदह जिल्हा न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 अंतर्गत बलात्कारासाठी तर कलम 66 आणि कलम 103 (1)अंतर्गत हत्या आणि मृत्यूसाठी दोषी ठरवलंय. सीबीआयने रॉयवर ठेवलेले सर्व आरोप सिद्ध झालेत. डॉक्टरवर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या केल्याबद्दल रॉय दोषी आढळल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले. 

आज कोलकत्ताचे न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास यांनी हा महत्त्वाचा निकाल दिला. तसेच पीडित कुटुंबाला 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश  दिले. मात्र पिडीतेच्या कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारचे भरपाई घेण्यास नकार दिला. सीबीआयने कोर्टामध्ये  पीडितेच्या नखाखाली सापडलेले नमुने संजय रॉयच्या डीएनएशी जुळत असल्याचे सिद्ध केले. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि ब्लूटूथ हेडफोन्ससारखे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात संजय रॉय हाच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

(नक्की वाचा-  "शिंदेंची गरज संपली, आता नवीन 'उदय' पुढे येईल"; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य) 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून हा खटला सुरू आहे. या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधलं राजकारणही ढवळून निघालं होतं. देशभरात भाजपने या प्रकरणावरून रान पेटवत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर या प्रकरणात निकाल लागला असून कोलकाताच्या निर्भयाला न्याया मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

Topics mentioned in this article