Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब' वाली 'ब्राझिलियन मॉडेल' समोर! Viral फोटोवर केला मोठा खुलासा

Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेला एका महिलेचा फोटो आता चर्चेत आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Rahul Gandhi vote theft allegations: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत 'वोट चोरी' चे गंभीर आरोप पुन्हा एकदा केले आहेत. या आरोपांना पुष्टी देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेला एका महिलेचा फोटो आता चर्चेत आला आहे. ही महिला म्हणजे लारिसा नेरी (Larissa Nery) असून तिने स्वतः समोर येऊन तिच्या व्हायरल फोटोबद्दल खुलासा केला आहे.

राहुल गांधींचा आरोप काय?

राहुल गांधी यांनी दावा केला आहे की हरियाणा निवडणुकीत सुमारे 25 लाख मतदारांचे मत चोरी झाले. हरियाणातील एकूण 2 कोटी मतदारांपैकी ही संख्या मोठी असल्याचा आरोप त्यांनी केला. 

त्यांनी एका महिलेचा फोटो दाखवला आणि असा दावा केला की हा फोटो हरियाणाच्या मतदार यादीत 'सीमा', 'स्वीटी' आणि 'सरस्वती' यांसारख्या विविध नावांनी 22 वेळा वापरला गेला आहे. त्यांनी ही महिला एक ब्राझिलियन मॉडेल असल्याचे म्हटले.

'ब्राझिलियन मॉडेल' लारिसा नेरीचा खुलासा

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्यानंतर फोटोमधील महिला लारिसा नेरी हिने स्वतः एक व्हिडिओ जारी करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. रिसा नेरीने सांगितले की, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलेला फोटो हा तिचा फार जुना आहे, जेव्हा ती सुमारे 20 वर्षांची होती.

Advertisement

( नक्की वाचा : 'तुम्हीच खंजीर खुपसला!'...KDMC मध्ये युती तुटणार? शिंदे गट-भाजपच्या वादात स्फोटक आरोप-प्रत्यारोप )

तिने पोर्तुगीज (Portuguese) भाषेतील व्हिडिओमध्ये आश्चर्य व्यक्त केले. AI-जनरेटेड ट्रान्सलेशननुसार, कथित मतदान घोटाळ्यात तिचा फोटो वापरल्याच्या बातम्या ऐकून तिला धक्का बसला. ती म्हणाली, 'मित्रांनो, मी तुम्हाला एक गॉसिप सांगते. तुम्ही खूप हसत आहात, बरोबर? मित्रांनो, ते माझा एक जुना फोटो वापरत आहेत. माझा फोटो जुना आहे, ठीक आहे? बघा, मी फोटोमध्ये खूप लहान होते. जवळपास 20 वर्षांची किंवा 18 वर्षांची (असेन)... भारतात, ते इतरांची फसवणूक करण्यासाठी मला एक भारतीय महिला म्हणून दाखवत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  हा फोटो तिच्या सुरुवातीच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील एक स्टॉक इमेज (Stock Image) आहे. हा फोटो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होता. नेरी आता डिजिटल इन्फ्लुएन्सर आणि हेअरड्रेसर म्हणून काम करते.

Advertisement

भारतीय पत्रकारांनी साधला संपर्क

या वादामुळे ती अचानक चर्चेत आल्याचे लारिसानं सांगितले. लारिसा म्हणाली की, एका पत्रकाराने तर तिची अधिक माहिती घेण्यासाठी ती काम करत असलेल्या सॅलूनशीही संपर्क साधला. तिने सांगितले की, एका रिपोर्टरने तिला मुलाखतीसाठी इन्स्टाग्रामवरही संपर्क साधला, पण तिने प्रतिसाद दिला नाही.