मोठी बातमी : पॅरासिटामॉल,व्हिटॅमिन D सह 50 हून जास्त औषधं टेस्टमध्ये फेल! इथं वाचा संपूर्ण यादी

केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेनं (CDSCO) नुकतीच औषधांच्या दर्जांची चाचणी घेतली. या चाचणीमध्ये 53 ओषधं फेल झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

53 Medicines Failed: आजारी पडल्यानंतर बरं होण्यासाठी आपण औषधं घेतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा कधी मेडिकल दुकानादाराला विचारुन अनेक जण गोळ्या घेतात. या औषधांची नावं देखील सवयीनं अनेकांच्या लक्षात असतात. तुम्ही-आम्ही रोज सवयीनं घेत असलेली, तुमच्या उपचाराच्या कागदावर लिहून देण्यात आलेली औषधं संपूर्ण निकष पूर्ण करतात का? याचा विचार तुम्ही केला आहे का? साहजिकच अनेक जण तो विचार करत नाहीत.पण, हा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. कारण, या सर्व औषधांबद्दल एक धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेनं (CDSCO) नुकतीच औषधांच्या दर्जांची चाचणी घेतली. या चाचणीमध्ये 53 ओषधं फेल झाली आहे. या यादीत बीपी, डायबेटीजसह व्हिटॅमिनच्या औषधांचाही समावेश आहे. त्याचबरोबर  CDSCO ज्या औषधांना फेल केलंय त्या यादीत ताप कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉल, पेन किलर डिक्लोफेनेक , फ्लुकोनाजोलसह देशातील मोठ्या औषधी कंपन्यांच्या औषधांचाही समावेश आहे. ही सर्व औषधं मेडिकल टेस्टमध्ये फेल झाली असून ती आरोग्यासाठी घातक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

( नक्की वाचा : मोठी बातमी : सपट कंपनीच्या चहा पावडरमध्ये आढळली कीटकनाशके )

जी 53 औषधं या चाचणीत फेल झाली आहेत त्यापैकी 48 औषधांची नावं आत्तापर्यंत समोर आली आहेत. उर्वरित 5 औषधं आमची नाहीत. त्या नावाची नकली औषधांची बाजारात विक्री होत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या चाचणीमध्ये अयोग्य जाहीर केलेल्या औषधांमध्ये Pantocid Tablet चा देखील समावेश आहे. या यादीमधील काही औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 

Photo Credit: (Source:CDSCO.WEB)

Photo Credit: (Source:CDSCO.WEB)

Photo Credit: (Source:CDSCO.WEB)

Photo Credit: (Source:CDSCO.WEB)

Photo Credit: (Source:CDSCO.WEB)

( स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एनडीटीव्ही या माहितीची जबाबदारी घेत नाही. )

Topics mentioned in this article