लखनऊमधील आशियाना येथील सरकारी लोकबंधु रुग्णालयात सोमवारी रात्री 9.30 वाजता भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. दुसऱ्या मजल्यावरुन आग पसरण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आयसीयू आणि फिमेल मेडिसिन वॉर्डात आग लागली. दोन्ही वॉर्डमध्ये 55 रुग्ण होते. यानंतर वॉर्डमध्ये एकच गोंधळ उडाला. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी मिळून 250 रुग्णांना सुखरुप बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाचं वीज बंद करण्यात आली. यामुळे सर्वत्र अंधार पसरला. यामुळे रुग्णांना बाहेर निघण्यास अडचणी जाणवत होत्या.
बातमी अपडेट होत आहे.