FSO Vijay Ahirwar Success Story : सलग सहावेळा अपयशाला सामोरं गेल्यानंतर मध्यप्रदेशच्या सागर येथील 27 वर्षांच्या अहिररावने हार मानली नाही. अखेर त्याने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आणि तो अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer) बनला. विशेष म्हणजे विजयने एससी कॅटेगरीत संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक मिळवला. विजयचं हे यश फक्त परीक्षा पास करण्याची कहाणी नाही,तर संघर्ष,धैर्य आणि अतूट आत्मविश्वासाचा एक आदर्श आहे.त्याने सिद्ध केलं की, कठीण परिस्थिती आणि सतत येणारं अपयशही त्या व्यक्तीला रोखू शकत नाही. जो त्याच्याकडे ध्येयाप्रती पूर्णपणे समर्पित झालेला आहे.
मध्य प्रदेशच्या सागर येथे राहणारा विजय अहिरवार एका सामन्य कुटुंबात राहतो. त्याच्या कुटुंबात एकूण सात भाऊ-बहिण आहेत.यामध्ये विजयसह 5 जण सरकारी विभागात कार्यरत आहेत.विजयचे वडील शिक्षक आहेत.ज्यांनी नेहमी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे. तरी त्यांच्या आईचं शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झालं आहे.पण त्यांनी मुलांच्या शैक्षणिक करिअरसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे.
कमी गुण मिळाल्यानंतरही मनोबल खचलं नाही
विजयचं सुरुवातीचं शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयात झालं. पण जीवनात एक कठीण मोड तेव्हा आला,जेव्हा त्याला 10 वीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आणि त्यामुळे त्याला शाळा सोडावी लागली.हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता.दरम्यान, विजय या अपयशामुळे खचला नाही. त्याने सागर येथील एका शाळेत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांच्या स्वप्नांना नवा आकार दिला.
नक्की वाचा >> KDMC मुख्यालयावर धडक मोर्चा, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, नेमकं प्रकरण काय?
MPPSC परीक्षेत 6 वेळा मिळालं अपयश
विजयने म्हटलंय की,त्याने सुरुवातीपासूनच त्याच्या जीवनाचं एक लक्ष्य पूर्ण केलं होते.त्याची MPPSC मध्ये निवड झाली होती. तसच त्याने इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरला नव्हता.त्याचं पूर्ण फोकस फक्त एकाच ध्येयाकडे होतं. पण यशाचं शिखर गाठणं तितकं सोपं नव्हतं.विजयने एकूण 6 वेळा MPPSC परीक्षा दिली. या दरम्यान तो दोनवेळा मुलाखतीच्या राऊंडपर्यंत पोहोचला. परंतु, अंतिम निवड झाली नाही. अनेकदा अपयश मिळाल्यानंतरही त्याने कधीच हार मानली नाही.
दररोज 12 तास अभ्यास
विजयने म्हटलंय की,यशस्वी होण्यासाठी त्याने दररोज जवळपास 12 तास अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अखंड मेहनत,सातत्य आणि संयम सर्वात महत्त्वाचा आहे.जो मेहनत करतो,त्याला एक दिवस नक्कीच यश मिळतं. फक्त सतत प्रयत्न करून स्वत:वर विश्वास ठेवण्याची आवश्यकता असते.