महाकुंभमेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं होत आहे. या कुंभमेळ्यासाठी जगभरातून भावीक येत आहेत. नागा बाबा, अघोरी, महिला संत, धार्मिक नेता या निमित्ताने प्रयागराजमध्ये एकत्र आले आहेत. इथं कोणी भगवान शंकराचे रुप घेवून आलं आहे तर कोणी माँ कालीच्या वेशात दिसत आहे. त्यात या महाकुंभ मेळाव्यात एका IITian Baba' ची जोरदार चर्चा आहे. त्यांना इंजिनिअर बाबा म्हणून बोललं जातं. त्यांचा असा दावा आहे की त्यांनी मुंबईच्या इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT Bombay) इथून इंजिनिअरींग केली आहे. मात्र त्यांनी तो रस्ता सोडून आध्यात्माचा मार्ग अवलंबला आहे. आध्यात्मातून शांती मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या इंजिनिअर बाबाचं खरं नाव अभय सिंह आहे. ते हरियाणाचे मुळ रहिवाशी आहेत. त्यांनी आपण IIT Bombay मधून शिक्षण घेतले असल्याचा दावा केला आहे. इंजिनिअरींगचं शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांचं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. त्यांना एक मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती. त्यावेळी त्यांना लाखो रूपयांचा पगार दिला होता असा या इंजिनिअर बाबाचा दावा आहे. नोकरीत त्यांचं मन लागत नव्हतं. त्यामुळे काही दिवसांनी त्यांनी ती नोकरी सोडली.
ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : परळीत राडा! कराड समर्थक आक्रमक, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
इंजिनिअर बाबांना लहानपणा पासून फोटोग्राफीचा छंद होता. त्यांनानंतर आपण ट्रॅव्हल फोटोग्राफर व्हाले असे वाटले. त्या संदर्भातला त्यांना कोर्स करायचा होता. त्यासाठी त्यांनी इंजिनिअरींग सोडली. त्यानंतर फोटोग्राफरचा कोर्स त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्या विचारसरणीतही बदल झाला. काही काळ त्यांनी कोचिंग ही केली. पण त्यातही त्यांचे मन लागले नाही. शेवटी त्यांना आध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांना आध्यात्मा विषयी आदर आणि आवड निर्माण झाली.
आध्यात्मात त्यांनी आपल्याला गुंतवून घेतलं. इंजिनिअर बाबांनी आपलं पुर्ण आयुष्य भगवान शंकराला समर्पीत केलं आहे. आपल्याला आध्यात्मात चांगलं वाटत आहे. सर्व काही शिव आहे. सत्य हेच शिव आहे. आणि शिव सुंदर आहे. असे त्यांनी आपले विचार तयार केले आहेत. आपल्यासाठी हे नवं आयुष्य आहे. त्यात आपण खुश आहोत. त्यांनी सर्व काही सोडून आध्यात्म अंगीकारलं आहे. त्यात आपल्याला आनंद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या कुंभमेळ्यात या इंजिनिअर बाबाकडे सर्वांचे लक्ष आहे. ते दर्जेदार इंग्रजी बोलत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत.