Mahakumbh Traffic : महाकुंभासाठी जाणाऱ्यांनी इकडं लक्ष द्या! कुठं आहे ट्रॅफिक जाम? वाचा सर्व अपडेट

Mahakumbh Traffic Update News : महाकुंभाला जाणाऱ्या सर्व भाविकांना सध्या अभूतपूर्व अशी 'ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे. प्रयागराजकडं जाणाऱ्या रस्स्त्यांवर कथितपणे शेकडो किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mahakumbh Traffic Jam : प्रयागराजच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर भयंकर ट्रॅफिक जाम झाला आहे. त्यामध्ये लाखो वाहनं अडकली आहेत.
मुंबई:

Mahakumbh Traffic Update :उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरु असलेल्या महाकुंभात आत्तापर्यंत 43 कोटी जणांनी पवित्र त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे. महाकुंभाचे आणखी 16 दिवस बाकी आहेत. 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ सुरु असेल. त्यामुळे कृपया महाकुंभला जाण्यासाठी गडबड करु नका. हे आम्ही तुम्हाला आज सांगतोय कारण, महाकुंभाला जाणाऱ्या सर्व भाविकांना सध्या अभूतपूर्व अशी 'ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे. प्रयागराजकडं जाणाऱ्या रस्स्त्यांवर कथितपणे शेकडो किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत. याबाबतच्या वृत्तानुसार जवळपास 300 किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यांवरील वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वीकेंडला (शनिवार-रविवार) प्रयागराजमध्ये जाममध्ये भाविकांची वाईट अवस्था होती. आजही (सोमवार, 10 फेब्रुवारी 2025) खराब परिस्थिती आहे. प्रयगागराजला जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर वाहनांची मोठी रांग लागली आहे. हा जाम गेल्या 2 किंवा 4 तासांपासून नाही तर 70 तासांपेक्षा जास्त आहे. या महाजामची कारणं काय आहेत ते पाहूया

कुठं-कुठं जाम आहे?

  • मध्य प्रदेशातील रीवा ते प्रयागराज रस्ता
  • आग्रा ते प्रयागराज रस्ता
  • गोरखपूर ते प्रयागराज रस्त्यांवर जाम आहे. 

जामचं कारण काय?

  • 12 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेचे स्नान आहे.
  • महाकुंभासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा 
  • या स्नानासाठी भाविकांची गर्दी वाढली
  • वीकेंडमुळे वाहतुकीवर दबाव
  • प्रयागराज जाणारे अनेक जण काशी आणि अयोध्येलाही जातात 
  • त्यामुळे या संपूर्ण भागातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा

महाकुंभाला जाणाऱ्यांना  सल्ला

  • 15 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजला जाणं टाळा
  • 12 तारखेला माघी स्नानासाठी मोठी गर्दी असेल
  • 13 तारखेला उर्वरित भाविक स्नान करतील. त्यामुळे गर्दी कायम असेल
  • पुढील दोन दिवस अयोध्या-काशीचं दर्शन घेऊन भाविक बाहेरपडेपर्यंत गर्दी
  • संगमाच्या ठिकाणी जाण्याचा हट्ट करु नका, जिथं असाल तिथं स्नान करा
  • कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
  • एकमेकांची मदत करा, प्रशासनाला सहकार्य करा

प्रयागराज संगम स्टेशन हे संगम घाटाच्या जवळ आहे. त्यामुळे या स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. हे स्टेशन सध्या बंद करण्यात आलं आहे. पण, प्रयाग जंक्शन स्टेशन सुरु आहे. 

( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
 

दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या भाविकांनी लक्ष द्यावं

तुम्ही मध्य प्रदेशातून प्रयागराजला जाणार असाल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. मध्य प्रदेशच्या सीमेपासून ते प्रयागराजपर्यंत भयंकर जाम आहे. मध्य प्रदेशातही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकांना मदत करण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रयागराजला जाणाऱ्या रस्त्यांवर 10-15 किलोमीटरपेक्षा जास्त जाम आहे. 
 

Advertisement