Mahaparinirvan Diwas: स्वतंत्र भारताच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान अढळ का आहे?

Mahaparinirvan Diwas 2024 :  सामाजिक समता, न्याय आणि उपेक्षितांच्या अंधकारमय आयुष्यात प्रगतीचा प्रकाश यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य वेचलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Mahaparinirvan Diwas 2024 :  आजचा नायक उद्याचा इतिहास होण्याचा सध्याचा काळ आहे. निवडणूक सभांना गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक पक्षाची दमणूक होते. ही गर्दी जमवण्यासाठी त्यांना अनेकदा कसरती कराव्या लागतात. सर्वच क्षेत्रात झपाट्यानं बदल होत असलेल्या आजच्या जगात आजही आणि पुढंही ज्यांचे विचार कायम वंदनीय असतील त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश आहे. 

डिसेंबर महिना सुरु झाला की जगभरातील भीमभक्तांना मुंबईचे वेध लागतात. 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुंबईतील चैत्यभूमीमध्ये लाखो भीमसैनिक बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी जमतात. ही गर्दी जमण्यासाठी कुणालाही प्रयत्न करावे लागत नाहीत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील सामान्य नागरिक बाबासाहेबांना या दिवशी वंदन करतात. ज्यांना मुंबईत येणं जमत नाही ती सर्व मंडळी आपल्या गावात, आपल्या परिसरात विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहतात. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अनुयायांच्या ऱ्हदयाच अढळ स्थान मिळवणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अग्रभागी आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बाबासाहेबांचं महत्त्व कायम का आहे?

सामाजिक समता, न्याय आणि उपेक्षितांच्या अंधकारमय आयुष्यात प्रगतीचा प्रकाश यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य वेचलं. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महूमध्ये झाला. प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. वकील, विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि उपेक्षित समाजाचे नेते अशी त्यांची ओळख होती. डॉ. आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जातीभेद निर्मुलन, दलितांचे उत्थान, सर्वांसाठी समानता आणि सन्मावर आधारित समाजाच्या निर्मितीसाठी समर्पित केले होते.  

महाराष्ट्रात महापरिनिर्वाण दिनाचे विशेष महत्त्व आहे. त्या दिवशी राज्य सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरवर्षी हजारो अनुयायी चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली देण्यासाठी जमा होतात. त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी जगभरातील नागरिकांची चैत्यभूमीवर समाधीस्थळी रिघ लागलेली असते. 'बाबासाहेब अमर रहे' या जयघोषानं संपूर्ण परिसर भारावलेला असतो. 

Advertisement

( नक्की वाचा : हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती?)
 

भारतीय राज्यघटना निर्मितीमधील बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता या दिवशी व्यक्त केली जाते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांना मूर्त स्वरूप देणाऱ्या भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात बाबासाहेबांचं अमुल्य योगदान होतं. राज्यघटना निर्मितीमधील त्यांच्या दूरदृष्टीची आजही सर्वांना प्रेरणा मिळते. अनेक सामाजिक चळवळींना लढण्यासाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरणा देतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल 1990 साली मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं आहे.