2 months ago

मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. काल ३ जूनलाही मुंबई, ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. आज सकाळीही पावसामुळे वातावरणात बदल जाणवत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. 

Jun 04, 2025 22:44 (IST)

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा तिसरा बळी, सतर्क राहाण्याच्या सुचना

केडीएमसी क्षेत्रात कोविडमुळे तिसरा मृत्यू झाला आहे.  77 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. केडीएमसीत एकूण रुग्ण 13 आहेत. त्यातील एका रुग्णाचा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर 

डिस्चार्ज रुग्ण आहेत.  गृह विलगीकरणात दोन जण आहेत. अशी माहिती कल्याण डोंबिवलीच्या  मुख्य आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांनी दिली आहे.  

Jun 04, 2025 20:33 (IST)

छत्रपती संभाजीनगरात धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगरात शहरात धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न 

शहरातील मुख्य क्रांती चौकात बंगरुळू मॅच जिंकल्यानंतर घडला प्रकार 

दुचाकीवरून आलेल्या नशेखर तरुणांनी रिक्षावर भिरकावला चाकू 

शेजारी उभी असलेली दुचाकी देखील लात मारून पडली 

आयपीएलमध्ये बंगळुरू जिंकल्या निमित्त चाहत्यांनी केला होता जल्लोष 

जल्लोषानंतर जाताना दोन दुचाकीवर आलेल्या 6 जणांनी केला दहशत पसरवण्याचा प्रयत्न 

पोलिसांना देखील हा व्हिडिओ मिळाला असून चाकू घेऊन धुडगूस घालणाऱ्या आरोपींचा शोध सुरू

Jun 04, 2025 18:30 (IST)

स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूची माहिती नाही - डी. के. शिवकुमार

RCB सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूची अजून ही माहिती नाही. जशी माहिती मिळेल तशी माध्यमांना दिली जाईल असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केलं आहे. 

Jun 04, 2025 18:24 (IST)

विराट कोहलीने RCB च्या चाहत्यांचे आभार मानले

18 वर्षांची प्रतिक्षा संपली. चाहत्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत असं यावेळी विराट कोहलीने सांगितलं. 

Advertisement
Jun 04, 2025 18:13 (IST)

बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला

बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला आहे. आता मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. तो आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Jun 04, 2025 18:03 (IST)

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले खेळाडूंचे स्वागत

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी RCB च्या खेळाडूंची स्वागत केले. त्यांचा कर्नाटकी पद्धतीने सन्मान करण्यात आला. 

Advertisement
Jun 04, 2025 18:01 (IST)

स्टेडीयममध्ये घुसण्यासाठी चाहते कारवर चढले, कारचे मोठे नुकसान

चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये घुसण्यासाठी चाहते कारवरही चढले होते. अनेक जण एकाच वेळी कारवर चढले असल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. 

Jun 04, 2025 17:57 (IST)

चिन्नास्वामी स्टेडीयमबाहेर जमलेल्या जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज

चिन्नास्वामी स्टेडीयम बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. 

Advertisement
Jun 04, 2025 17:50 (IST)

RCB च्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांची ही उपस्थिती

RCB च्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांची ही उपस्थिती लावली आहे. शिवाय सर्व खेळाडूही मंचावर उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी चाहत्यांना अभिवादन केलं. 
 

Jun 04, 2025 17:48 (IST)

RCB चे खेळाडू सत्कारार समारंभासाठी उपस्थित

RCB चे खेळाडू सत्कारार समारंभासाठी उपस्थित राहिले आहेत. विराट कोहली, रजत पाटीदार यांची एक झलक पाहाण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. 

Jun 04, 2025 17:41 (IST)

आरसीबीच्या खेळाडूंसाठी होता स्टेडीयममध्ये खास कार्यक्रम

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आज चिन्नास्वामी स्टेडीयमवर सर्व आरसीबी खेळाडूंसाठी एक विशेष सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

Jun 04, 2025 17:38 (IST)

चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये चेंगराचेंगरीच 50 पेक्षा जास्त जखमी

चिन्नस्वामी स्टेडीयममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. अनेक जण स्टेडीअममध्ये खुसण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Jun 04, 2025 17:36 (IST)

चिन्नास्वामी स्टेडीअममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी

चिन्नास्वामी स्टेडीअममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. अनेक फॅन्स स्टेडीअमच्या भिंतीवरून आत घुसण्याचा ही प्रयत्न करत आहेत. काही जण झाडावर चढून आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Jun 04, 2025 17:24 (IST)

बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडीअममध्ये चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू

बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडीअममध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.  RCB चा संघ बंगळूरूमध्ये दाखल झाला आहे. त्यांची विजयी मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते जमले होते.   

Jun 04, 2025 16:58 (IST)

जनगणना 1 मार्च 2027 पासून सुरू होणार, 2 टप्प्यात होणार गणना

जनगणना 1 मार्च  2027 पासून सुरू होणार आहे. ही जनगणना 2 टप्प्यात होणार आहे. या जनगणनेतच जातीय जनगणना ही केली जाईल.  

Jun 04, 2025 16:23 (IST)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांची महत्वाची बैठक

आज सह्याद्री गेस्ट हाऊस या ठिकाणी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरत गोगावले यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत रायगड पालकमंत्री पदाबाबत  महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. 

सेनेचे मंत्री व आमदार अजित पवारांवर नाराज आहेत. त्यामुळे रायगड पालकमंत्री पदावरून नाराज गोगावले यांच्या मागणी बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 04, 2025 15:27 (IST)

रत्नागिरीत 400 फूट खोल दरीत कार कोसळली, एकाचा मृत्यू

कोल्हापूरला राजापूरशी जोडणाऱ्या अणूस्कुरा घाटात भीषण अपघात झाला आहे. 400 फूट खोल दरीत एक कार कोसळून लांजा येथील कौस्तुभ विजय कुरूप या 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची भीषणता इतकी होती की, कारचं इंजिन घाटातील रस्त्यावर येऊन पडलं, तर कौस्तुभचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला. कारचे अक्षरशः तुकडे झाले असून, ही घटना आज सकाळी उघडकीस आली. काल पहाटे हा अपघात झाला असल्याची शक्यता आहे. 

Jun 04, 2025 15:18 (IST)

RCB ची टीम बंगळूरूमध्ये दाखल, आज निघणार विजयी मिरवणूक

RCB ची टीम बंगळूरूमध्ये दाखल झाली आहे. आयपीएलचे विजेते ठरल्यानंतर त्यांची  आज  विजयी मिरवणूक निघणार आहे.  

Jun 04, 2025 12:54 (IST)

Live Update : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला तूर्तास विराम

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला तूर्तास विराम

काल रात्री उशिरा शरद पवार गटाची महत्वाची बैठक पार पडली

या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली माहिती

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील पुण्यातच पार पडणार वर्धापन दिन होणार

पुण्यातील एका मोठ्या सभागृहात होणार वर्धापन दिन मेळावा

या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी राहणार उपस्थित

Jun 04, 2025 12:50 (IST)

Live Update : दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार गैरहजर, आपचे नेतेही अनुपस्थित

दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार गैरहजर, आपचे नेतेही अनुपस्थित

Jun 04, 2025 12:16 (IST)

Live Update : दुर्गाडी किल्ला परिसरातील काही भाग कोसळला

दुर्गाडी किल्ला परिसरातील काही भाग कोसळला

Jun 04, 2025 12:00 (IST)

Live Update : सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षाविरोधी काम केल्यानं दाखवला बाहेरचा रस्ता

सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षाविरोधी काम केल्यानं दाखवला बाहेरचा रस्ता

Jun 04, 2025 10:54 (IST)

Live Update : ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

ठाण्याहून नवी मुंबई कडे जाणाऱ्या कळवा उड्डाणपूल वाहतूक कोंडीनेग्रस्त..

जड अवजड वाहनांसह चार चाकी व दुचाकी वाहन चालकांची फजिती..

वाहतूक विभाग मॅन्युअल पद्धतीने वाहतूक हाताळत आहेत..

Jun 04, 2025 09:53 (IST)

Live Update : माजी मंत्री धनंजय मुंडे अचानक नाशिक दौऱ्यावर

माजी मंत्री धनंजय मुंडे अचानक नाशिक दौऱ्यावर

* एका धार्मिक विधीसाठी धनंजय मुंडे रामकुंडावर उपस्थित

* काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरीतील विपश्चना केंद्रात केली होती ध्यानधारणा

Jun 04, 2025 09:52 (IST)

Live Update : पुणे शहरातील होर्डिंगचे होणार सर्वेक्षण

शहरातील बेकायदा होर्डिंगबाबत तक्रार आल्या असल्याने शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण केले जाईल, तसेच धोकादायक व बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई केली जाईल, असे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या सांगितले

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता

Jun 04, 2025 08:55 (IST)

Live Update : अंजली दमानियांना लाचलुचपत खात्याने चौकशीसाठी बोलावले, आज चौकशी

अंजली दमानिया यांना लाचलुचपत खात्याने चौकशी साठी बोलावले 

धनंजय मुंडे यांनी केलेल्या शेतीविषयक सामानाच्या भ्रष्टाचारप्रकरणी होणार ही  चौकशी 

11.30 वाजता वरळी येथील लाचलुचपत खाते कार्यालयात राहणार हजर 

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा दमानिया यांचा आरोप

Jun 04, 2025 08:00 (IST)

Live Update : नवी मुंबई घणसोली बस डेपोमध्ये भीषण आग; दोन बस जळून खाक

नवी मुंबईतील घनसोली येथील एमआयडीसी परिसरात स्थित बस डेपोमध्ये काल दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत दोन बस जळून खाक झाल्या असून, प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.  सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. डेपो परिसरात इतर अनेक बसेस पार्किंगमध्ये असल्यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे डेपो व्यवस्थापनाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Jun 04, 2025 07:50 (IST)

Live Update : शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत द्या, नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर काँग्रेसची पत्रकार परिषद

 मे महिन्यात अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषिमंत्री चुकीचे वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई सरकारने द्यावी. याकरिता राज्यपालांपुढे कैफीयत मांडून मागणी करणार आहे, असे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक वीरेंद्र जगताप यांनी सांगितले.

Jun 04, 2025 07:39 (IST)

Live Update : नागपुरात कोविडच्या दोन रुग्णांचा मृत्यू

- नागपुरात कोविडच्या दोन रुग्णांना इतर आजार असल्यानं मृत्यू, आणखी दोन नवीन कोविड रुग्ण सापडले  आहेत..

- कोविडची लागण असून मृत्यू झालेल्या दोन कोविड रुग्णांपैकी नागपुरातील रुग्णाला एचआयव्ही आणि क्षयरोग देखीलअसल्याचं पुढे आले.

- मयत दुसरा रुग्ण हा चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्याला मूत्रपिंडाचा आजार असल्याचं समोर आलं..

- आतापर्यंत 17 रुग्णाची नोंद. ही नागपुरात 1 जानेवारी ते 3 जून पर्यंत नोंद झाली आहे...

- यापैकी चार रुग्णावर उपचार सुरू आहे, दोघांचा मृत्यू तर 11 रुग्णांना सुट्टी झाली आहे.

Jun 04, 2025 07:16 (IST)

Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात आंबा,भुईमूग ,कोकम, कलिंगड , इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे सरसकट होत नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेंन सावंत यांच्या नेतृत्वाखाली  कुडाळ तहसीलदार यांची भेट घेत नुकसानी पंचनामे बाबत जाब विचारला, तसेच महायुती सरकारवरही तोफ डागली शासन शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहत नाही. शेतकऱ्यांचे पंचनामे होत नाहीत. कर्जमाफी होत नाही असा आरोप केला

Jun 04, 2025 07:13 (IST)

Live Update : मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी

मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी 

दोन दिवस पावसाने मुंबई आणि उपनगरात विश्रांती घेतल्याने उकाडा वाढला होता 

मात्र काल रात्रीपासून आणि पहाटे पडलेल्या पावसाच्या सरींमुळे गारवा निर्माण झाला 

मुंबई, ठाणे पालघरमध्ये  काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे