- राज्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक झाली होती.
- 125 पंचायत समित्यांसासाठीही निवडणूक झाली होती
- आज म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात आली
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांसासाठी निवडणूक झाली होती. 'मिनी विधानसभा' निवडणूक असे वर्णन करण्यात आलेल्या या निवडणुकीचे निकाल 9 तारखेला लागले. या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मदतान झाले. 9 फेब्रुवारी रोजी म्हणजेच सोमवारी या निडणुकांचे निकाल लागणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. आज मतमोजणी होत असून मतदारांनी दिलेला कल हळूहळू स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. या कलांमध्ये 12 जिल्हा परिषदांमधील कोणती जिल्हा परिषद कोणत्या पक्षाकडे जाऊ शकते याचा अंदाज येऊ लागला आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्रात कोणकोणत्या झेडपी आणि पंचायत समितीसाठी मतमोजणी होतेय? पाहा संपूर्ण यादी
कोणत्या जिल्हा परिषदांसाठी मतमोजणी सुरू आहे? पाहा संपूर्ण यादी
रायगड,
रत्नागिरी,
सिंधुदुर्ग,
पुणे,
सातारा,
सांगली,
सोलापूर,
कोल्हापूर,
छत्रपती संभाजीनगर,
परभणी,
धाराशीव,
लातूर
कल काय सांगतोय?
जे कल आतापर्यंत हाती आले आहेत त्यानुसार काँग्रेस ही एका जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही 2 जिल्हा परिषदांमध्ये वर्चस्व मिळण्याची शक्यता दिसते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप हाच मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. 12 पैकी 8 जिल्हा परिषदांवर भाजप वर्चस्व मिळवण्याची शक्यता सुरूवातीच्या कलांमध्ये दिसते आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही 12 पैकी 1 जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्याची शक्यता दिसते आहे. दुपारी 2.30 वाजेपर्यंत जे कल हाती आले होते, त्या कलांच्या आधारे हे चित्र दिसून आले आहे.
नक्की वाचा: Solapur ZP Result: राम सातपुतेंनी वचपा काढला! मोहिते-पाटील अन् जानकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा गुलाल
4 हजार 814 उमेदवारांचे भवितव्य पणाला
सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागा असून, त्यातील 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार 624 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 125 पंचायत समित्यांमध्ये मिळून एकूण 1 हजार 462 जागा आहेत, त्यातील 731 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण 4 हजार 814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.