Mamta Kulkarni News : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिला आहे. ममता यांची मागील महिन्यात महामंडलेश्वर बनवण्यात आलं होतं. त्यांच्या नियुक्तीनंतर नवा वाद निर्माण झाला होता.
ममता कुलकर्णी यांनी यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, 'मला महामंडलेश्वर पद सन्माम म्हणून देण्यात आले होते. पण, या विषयावरचा वाद संपवा म्हणून मी राजीनामा देत आहे. मी गेल्या 25 वर्षांपासून साध्वी होते, पुढंही राहीन. मी महामंडलेश्वर झाल्याचा ज्यांना आक्षेप होता , त्यांच्याबद्दल कमी बोललेलंच चांगलं आहे.'
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या ममता?
ममता कुलकर्णी यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं की, 'मी महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी मी या पदावरुन राजीनामा देत आहे.मला महामंडलेश्वर घोषित करण्यावरुन किन्नर आखाडा आणि अन्य आखाड्यामध्ये जो वाद होत आहे. मी 25 वर्षांपासून साध्वी होते. साध्वीच राहणार. मला महामंडलेश्वराचा सन्मान देण्यात आला होताय. cr 25 वर्ष केलेल्या साधनेचा त्यांनी सन्मान केला होता. हे काही जणांसाठी आपत्तीजनक झाले होते.
मी 25 वर्ष तप केले. मी 25 वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडले. मी स्वत:हून गायब होते. अन्यथा मेकअपपासून, बॉलिवूडपासून इतकं दूर कोण राहतं? माझ्या अनेक गोष्टींबाबत लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. मी हे का करते? मी ते का करते? नारायण तर सर्व संपन्न आहेत. ते सर्व प्रकारचे आभूषण घातल्यानंतरही महायोगी आहेत.
( नक्की वाचा : Mamta Kulkarni : किन्नर आखाड्याची ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई! लक्ष्मी त्रिपाठींनाही दणका )
मी महामंडलेश्वर झाल्याचा अनेकांना त्रास झाला होता. हा सर्व वाद पाहून मला इतकंच म्हणायचं आहे की, मी ज्या गुरुंच्या सानिध्यात 25 वर्ष घोर तपस्या केली ते सिद्ध महापुरुष होते. श्री चैतन्य गगनगिरी महाराज असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या बरोबरीचं कुणीही नाही. सर्व अहकांरी आहेत. एकमेकांशी भांडत आहेत. माझे गुरु तर खूप थोर आहेत. मी त्यांच्या सानिध्यात 25 वर्ष तपस्या केली आहे. मला कैलास पर्वत किंवा मानससरोवरला जाण्याची गरज नाही. माझ्याबद्दल ज्यांना आक्षेप आहे त्यांच्याबद्दल कमी बोलणंच चांगलं आहे.
पैशांचे व्यवहार झाले
ममता कुलकर्णीनं यावेळी पैशांच्या व्यवहाराची देखील माहिती दिली. मी आचार्य डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचा आदर करते. मला 2 लाख रुपये मागण्यात आले होते. माझ्यासमोर 3-4 महामंडलेश्वर होते. 3-4 जगद्गुरु होते. त्याच रुममध्ये पैसे मागण्यात आले. मी माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या खोलीत बसलेल्या जय आंबागिरी महामंडलेश्वरांनी त्यांच्याकडचे दोन लाख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना दिले होते. पण, पैशांपासून काहीही नसतं. मी मा चंडीची आराधान केली. तीच मला या सर्वांमधून बाहेर पडण्याचे संकेत देत आहे,' असं त्यांनी स्पष्ट केले.