बिहारमध्ये गुंडगिरीने कळस गाठला आहे. खून आणि अपहरणाच्या गुन्ह्यातील कुख्यात अपराधी चंदन सिंह याची गुरुवारी (17 जुलै) हत्या करण्यात आली. चंदनला एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो काही दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता. पाटण्यातील पारस हॉस्पीटलमध्ये तो इलाजासाठी दाखल झाला होता. याचा सुगावा लागताच 5 जण या हॉस्पीटलमध्ये घुसले आणि त्यांनी चंदनला ठार मारले. या घटनेने बिहारमधील कायदा आणि सुव्यवसथा किती ढासळली आहे याची कल्पना येऊ शकते.
पाचही मारेकऱ्यांची ओळख पटली
चंदन मिश्रा हत्याकांडातील पाचही आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तौसीफ बादशाह नावाच्या गुंडाने चंदन मिश्राला ठार मारण्याचा निर्णय घेतला होता. तो आणि त्याचे चार साथीदार पारस हॉस्पीटलमध्ये घुसले आणि त्यांनी चंदन उपचार घेत असलेल्या वॉर्डात घुसून त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हत्या केल्यानंतर इतर गुंड पळून गेले मात्र तौसीफ बादशाह मोठा पराक्रम केलाय अशा थाटात आरामात निघून गेला होता.
कोण आहे तौसीफ बादशाह?
जमीन खरेदी विक्रीचे सौदे करणारा तौसीफ बादशाह हा नामचीन गुंड आहे, सुपारी घेऊन लोकांना ठार मारणे हा त्याचा धंदा बनला होता. पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घालून चंदन मिश्राला गोळ्या घालणारा तौसीफ बादशाह हा स्वत:ला हिरो समजतो.पाटणाच्या सेंट कॅरेन्स शाळेत शिकलेला तौसीफ फुलवारी शरीफ परिसरातून आपले साम्राज्य चालव होता. स्वत:ला बादशाह म्हणवणाऱ्या तौसीफने चंदनला संपवण्यासाठी सुपारी घेतली असावी असा अंदाज असून त्याला सुपारी नेमकी कोणी दिली याचाही पोलिसांना शोध घ्यावा लागेल.