काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी यंदा माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या शैक्षणिक योग्यतेवर टोला लगावलाय. दोनदा नापास झाल्यानंतरही त्यांना पंतप्रधान केल्यामुळे आश्चर्य वाटलं, असं अय्यर यांनी सांगितलं. अय्यर यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका मुलाखतीमध्ये अय्यर यांनी सांगितले राजीव गांधी यांच्या शैक्षणिक कामगिरीवर मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, 'राजीव गांधी पंतप्रधान झाले त्यावेळी मी विचार केला की एक व्यक्ती पायलट होता. दोनदा नापास झाला. तो पंतप्रधान कसा होऊ शकतो?
मी त्यांच्याबरोबर केंब्रिजमध्ये शिक्षण घेतलं आहे. तिथं ते नापास झाले. त्यानंतर तके इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये गेले. तिथंही नापास झाले. केंब्रिजमध्ये नापास होणे खूप अवघड आहे. कारण, विद्यापीठ स्वत:ची छवी खराब होऊ देत नाही. त्यानंतरही ते नापास झाले. या प्रकारचा शैक्षणिक रेकॉर्ड असलेला व्यक्ती पंतप्रधान कसा होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. असं अय्यर यांनी सांगितलं.
काँग्रेसची टीका
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याची माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल यांनी टिका केली आहे. ते म्हणाले की, 'मी त्यांचं वक्तव्य पाहिलेलं नाही. त्यांनी या पद्धतीनं वक्तव्य केलं असेल तर ते चूक आहे. राजीव गांधी महान नेता होते. त्यांनी खूप कमी कालावधीमध्ये नाव कमावलं. परदेशात त्यांचा आदर होता.
( नक्की वाचा : मुस्लीम महिलांना पोटगीचा अधिकार मिळताच शाहबानो खटला आणि राजीव गांधींची पुन्हा चर्चा का? )
अय्यर राजीव गांधींसोबत राहिले आहेत. त्यांच्याबरोबर काम केलं आहे. त्यांना एकेकाळी राजीव गांधींचे निकवर्तीय असल्याचा अभिमान होता. त्यांच्याकडून याबाबतच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. राजीव गांधींनी देशासाठी काय केलं आहे हे सर्व जगाला माहिती आहे.'