Maruti Fronx Discount Offer 2025 : जर तुम्ही कॉम्पॅक्ट SUV खरेदी करायचा विचार करत असाल, तर मारूती फ्रॉन्क्स (Maruti Fronx) खरेदी करण्यासाठी डिसेंबर 2025 हा परफेक्ट महिना ठरू शकतो. मारूती या महिन्यात फ्रॉन्क्सवर (Fronx) जबरदस्त ऑफर्स देत आहेत. यामध्ये 78000 रुपये इतकं डिस्काऊंट मिळणार आहे.विशेषत: फ्रॉन्क्स टर्बोवर कंपनीने जबरदस्त डिस्काऊंटच्या ऑफरची घोषणा केलीय. या ऑफरबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती..
मारूती फ्रॉन्क्सची किंमत किती?
मारूती फ्रॉन्क्सची भारतातील आताची किंमत 6.85 लाख रुपयांपासून 11.98 लाख रुपये (एक्स शो रूम) पर्यंत आहे. या ऑफर्सनंतर ही एसयूव्ही तिच्या सेगमेंटमध्येही सर्वात जास्त (व्हॅल्यू-फॉर-मनी) बनली आहे.
मारूती फ्रॉन्क्सवर किती डिस्काऊंट?
मारूती फ्रॉन्क्सवर (Fronx Turbo) वर सर्वात मोठी ऑफर आहे. कंपनीने या कारसाठी 88000 रुपयांपर्यंतचं डिस्काऊंट दिलं आहे. मारुती फ्रॉन्क्स (Fronx)चे टर्बो व्हेरिएंट्सवरही या महिन्यात सर्वात जास्त सूट दिली जात आहे.
नक्की वाचा >> Thar Viral News : ना स्टंटबाजी..ना मारली शायनिंग! रायडरने गोव्यात असं काही केलं..EMI सह घरखर्चही निघाला!
ऑफर्समध्ये या गोष्टींचा समावेश
मारुती फ्रॉन्क्सवर मिळणाऱ्या डिस्काऊंटच्या ऑफरबाबत बोलायचं झालं तर,45000 रुपयांपर्यंतचं कॅश डिस्काऊंट, 43000 रुपयांची व्हेलोसिटी पॅकेज (Velocity Package) एक्सेसरी किट मिळत आहे. हे सर्व बेनिफिट्स मिळून एकूण 88000 रुपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे.
फ्रॉन्क्स पेट्रोवरही मोठं डिस्काऊंट
मारुती फ्रॉन्क्स पेट्रोल व्हर्जनच्या कारवरही 35000 रुपयांची दमदार ऑफर मिळत आहे. जर तुम्ही पेट्रोल व्हर्जनची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डिसेंबर महिन्यात यावरही अनेक फायदे मिळणार आहेत.
नक्की वाचा >> धर्मेंद्रसोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनीच्या आयुष्यात आले सर्वात वाईट दिवस, ही-मॅनचं काय चुकलं होतं?
फ्रॉन्क्सच्या सीएनजी व्हेरिएंटवरही सूट
फ्रॉन्क्सच्या सीएनजी व्हेरिएंटवरही 30000 रुपयांपर्यंतचं डिस्काऊंट मिळत आहे. CNG व्हर्जन खरेदी करणाऱ्यांसाठी मारूतीने खास ऑफर ठेवली आहे. कंपनी यावर 20000 रुपयांचं कॅश डिस्काऊंट देत आहे.याशिवाय 10 हजार रुपयांचं एक्स्चेंज बोनसही मिळत आहे. यामुळे एकूण 30000 रुपयांचं डिस्काऊंट मिळत आहे.