मुंबई:
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं केलेल्या सर्व कुरापतींची माहिती परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्यानं देशासमोर ठेवली आहे. शुक्रवारी (9 मे) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी पाकिस्ताननं केलेल्या चिथावणीखोर कृत्याची माहिती दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय सशस्त्र दलानं अतिशय जबाबदारीनं उत्तर दिलं आहे. त्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्ताननं 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतानं हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्ताननं भारतीय सैन्याची ठिकाणं पाकिस्तानचे लक्ष्य होते. त्याचबरोबर त्यांनी एलओसीवर (लाईन ऑफ कंट्रोल) देखील गोळीबार केला. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्ताननं 8 आणि 9 मे च्या रात्री रहिवाशी भागांनाही लक्ष्य केले.
- पाकिस्ताननं रात्री भारतीय सैन्याच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
- पूर्व पश्चिम सीमेवर भारतीय वायू क्षेत्राचे अनेकवेळा उल्लंघन केले.
- पाकिस्तान सैन्यानं नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणात गोळीबार केला.
- लेह ते सर क्रीक पर्यंतच्या 36 ठिकाणी 300 ते 400 ड्रोनचा वापर घुसखोरीसाठी करण्यात आला. भारतीय सशस्त्र दलानं अनेक ड्रोन खाली पाडले.
- एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांचा उद्देश हा वासू सुरक्षा प्रणालीचे परीक्षण करणे तसंच गुप्त माहिती गोळा करणे हा होता.
- ड्रोनच्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. हे ड्रोन तुर्किएचे होते, ही माहिती रिपोर्टमधून समजली आहे.
- पाकिस्ताननं एका हत्यारबंद ड्रोननं भडिंडामधील सैन्याचा तळ लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तो ड्रोन पाडण्यात आला.
- या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील 4 हवाई संरक्षण स्थळांवर ड्रोन उडवण्यात आले. यामध्ये एडी रडार नष्ट करण्यात ड्रोनला यश आले.
- या हल्ल्याला दिलेल्या उत्तरामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे.