Monsoon In India: भीषण उन्हाच्या तडाख्यात चांगली बातमी, पुढील पाच दिवसात देशात मान्सूनची एन्ट्री!

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भारतीय हवानान विभागाने मान्सूनबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो. हवामानतज्ज्ञांनुसार, केरळमध्ये मान्सूनची सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील हवामान विभाग केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसात केरळात मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. दक्षिण अरबी समुद्रात काही भाग, मालदीवचा प्रमुख भाग, दक्षिण-पश्चिम आणि मध्य बंगालच्या खाडीतील काही भाग, बंगालची पुर्वेकडील खाडी आणि पूर्वेकडील राज्यांच्या काही भागात मान्सून येण्याची शक्यता आहे.  

महाराष्ट्रात वाढत्या उकाड्यामुळे मान्सून लवकर येण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राज्यात उन्हाचा तडाका वाढत आहे. तर दुसरीकडे मान्सून आगेकूच करताना दिसत आहे. 9 तारखेला अंदमानात दाखल झालेला मान्सून आता 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. तर 15 जूनपर्यंत मान्सूनचं नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह मराठवाडा विदर्भात आगमन होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मान्सून अगोदर काही दिवसात उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा - 'रेमल' चक्रीवादळाचा कहर, पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ही राज्यं अलर्टवर

पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'रेमल' चक्रीवादळ धडकलं आहे. परिणामी महाराष्ट्रातही अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या लाटा  उसळत आहे. अनेक भागांमध्ये किनाऱ्यावर उंचच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात अवकाळीबरोबरच 1 जूनपर्यंत उष्णतासदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त आहे.  यवतमाळचं तापमान 45 अंशांच्या पुढे, तर जळगावचा पारा 43 अंशांवर गेला आहे.  

Advertisement

राज्यात उष्णतेचा अलर्ट
राज्यासह देशात तापमान चांगलेच वाढले आहे. देशात अनेक राज्यात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे.  मुंबईसह कोकणात 10 जूनच्या आसपास प्रवेश करण्याची शक्यता आहे.  कोकणात आल्यनंतर 15 जून दरम्यान कोकणातून घाटमाथा ओलांडून खानदेश,  नाशिक, नगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  20 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर पसरण्याचा अंदाज आहे.

Advertisement