Mahakumbh Conclave : महाकुंभमेळ्यात स्वच्छता कशी राखणार? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

NDTV Mahakumbh Conclave : जगातील सर्वात मोठ्या महाकुंभच्या आयोजनावर 'एनडीटीव्ही कॉन्क्लेव' मध्ये चर्चा झाली. या चर्चेत देशातील दिग्गज संत, अर्थशास्त्रत्र एकाच स्टेजवर उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

NDTV Mahakumbh Conclave : जगातील सर्वात मोठ्या महाकुंभच्या आयोजनावर 'एनडीटीव्ही कॉन्क्लेव' मध्ये चर्चा झाली. या चर्चेत देशातील दिग्गज संत, अर्थशास्त्रत्र एकाच स्टेजवर उपस्थित होते. त्यांनी महाकुंभमेळ्याची आर्थिक बाजू आणि त्यावर होणारे परिणान याबाबत त्यांचे विचार मांडले. यावेळी  'प्रकृति पर आस्‍था का महाकुंभ' या सत्रात शोभित कुमार सहभागी झाले होते. ते अदाणी ग्रुपच्या वतीनं स्वच्छ गंगा मिशन फ्रेम वर्कच्या अंतर्गत प्रयागराज प्रोजेक्ट चालवत आहेत. निसर्गाकडून आपण जे घेतो, ते त्याला त्याच स्वरुपात वापस करावं असा सल्ला कुमार यांनी यावेळी दिला. 

स्‍वामी चिदानंद सरस्‍वती (परमार्थ निकेतन आश्रम, ऋ‍षीकेषचे अध्‍यक्ष ), प्रा. बद्रीनारायण (सामाजिक इतिहासकार आणि प्राध्यपक) तसंच ऋषी अग्रवाल (पर्यावरण विज्ञान संचालक, मुंबई सस्टेनेबिलिटी सेंटर) हे देखील या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

45 कोटींना समजवण्याची गरज नाही

महाकुंभमेळ्याच्या दरम्यान नदी कशी स्वच्छ राहणार? हा एक मोठा प्रश्न आहे. प्रा. बद्रीनारायण यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, 'महाकुंभ मेळ्यात 45 कोटी भाविक येणार आहेत. त्यामधील बहुतेकांना गंगा नदी पूजनीय आहे. त्यांच्यासाठी गंगेला आईचा दर्जा आहे. पण, यामधील काही जणांना घाण करण्याची सवय आहे. आपल्याला त्या लोकांना नदी घाण करु नका, हे समजवण्याची गरज आहेय. त्यासाठी पोलीस आणि प्रशासन काम करत आहेत. कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लोकांमध्ये जागृती केली जात आहे.

काय आहे प्रोजेक्ट प्रयागराज?

प्रयागराज प्रोजेक्टबद्दल बोलताना शोभित कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, 'निसर्ग आपल्याला जे काही देतो, उदा: हवा, पाणी, माती आपल्याला त्याला त्याच स्वरुपात परत द्यायला हवं. आपल्याला त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. आपल्याला पुढील पिढीला त्यांची संपत्ती परत दिली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Mahakumbh Conclave : कुंभमेळ्याचा आध्यात्मिक पर्यटनला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर )
 

आम्ही स्वच्छ गंगा मिशनच्या अंतर्गत प्रयागराज प्रोजेक्ट 2019 साली सुरु केलं होते. ते 2023 साली पूर्ण झाले. त्यामध्ये 9 एसटीपी आहेत. त्यापैकी 6 चे आम्ही पूनर्वसन केले आहे. 3 नवे एसटीपी बनवले आहेत. 3 नवे एसटीपी बनवले आहेत. आमची इंस्टोल्ड क्षमता 326 एमएलडी आहे. त्यामध्ये 326 मिलियन लीटर पाण्यावर प्रक्रिया होते आहे. हे प्रक्रिया झालेले पाणी पिण्यासाठी योग्य आहे.'

( नक्की वाचा : Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात कधी होणार शाही स्नान? वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्व )
 

पवित्र डुबकी

शोभित कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, 'प्रोजेक्ट प्रयागराजमुळे आज 90 टक्के नाल्यातील पाणी बंद झाले आहे. या नाल्यातील पाण्यांवर प्रक्रिया करुन ते गंगेत सोडले जात आहे. अर्धकुंभ ते महाकुंभच्या दरम्यान बराच फरक पडलाय. हा फरक आता लोकांना दिलत आहे. सरकारनं काम केलंय हा संदेश देखील यामुळे लोकांमध्ये जाणार आहे. त्यामुळे आता प्रयागराजमधील महाकुंभमध्ये भक्तीची डुबकी ही पवित्र डुबकी असेल. हा प्रोजेक्ट 15 वर्ष चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Advertisement


 

Topics mentioned in this article