Union Education Minister Dharmendra Pradhan resign: नीट पेपर फुटीप्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कोक्रोच पार्टीच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला आहे.
देशभरात सुरु असलेल्या नीट पेपर फुटीविरोधातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना दोन पानी पत्राद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे. राजीनामा देण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. "गेल्या १० दिवसांतील घटनांमुळे मी व्यथित झालो आहे. "हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. मी देशाच्या युवाशक्तीला कोणत्याही दुष्टचक्रात अडकू देणार नाही. हा माझा निर्धार आहे," असे ते म्हणाले.
Raj Thackeray : मुंबईमधील मोर्चासाठी राज ठाकरेंचे कडक नियम! मनसैनिकांना थेट आदेश; कुणाला दिला इशारा?
'नीट' (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशाच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्लीत संतापजनक आणि आक्रमक वातावरण पाहायला मिळाले होते. जंतर-मंतरवर कोक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. संसद परिसरात तसेच दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थी आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी जोरदार निदर्शने केली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक आक्रमक झाले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने तीन वेळा आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केली मात्र विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होते. अखेर आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मोठे यश आले असून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे.
CJP Protest: अभिजीत दीपके यांना टायफॉइडची लागण; आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार?