Delhi Assembly Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी (Delhi Assemblye Election Counting) झाली. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची (Aam Aadmi Party AAP) सत्ता असून, ती टीकवण्यासाठी आप प्रयत्न करत आहे, तर आपला सत्तेतून बेदखल करत सत्तेत विराजमान होण्यासाठी भाजप आणि काँग्रेस प्रयत्न करत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत दिल्लीत काय होणार याचे चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार अशी चिन्हे दिसत होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
70 जागांपैकी भाजपचे 43 उमेदवार आघाडीवर होते तर आपचे 23 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेसचा फक्त एक उमेदवार आघाडीवर होता. सकाळी 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांमधून ही परिस्थिती स्पष्ट झाली होती. दिल्लीमध्ये बहुमतासाठी किमान 36 जागा जिंकणे आघाडी किंवा पक्षाला गरजेचे असते. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप सहजपणे बहुमताचा आकडा गाठू शकेल असे चित्र दिसत होते, अर्थात हे सुरूवातीचे कल होते खरे चित्र मतमोजणीच्या सगळ्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार होते.
निवडणुकांचे निकाल (Delhi Assembly Election Result 2025 update) जाहीर होण्यापूर्वी आप आणि काँग्रेसची आघाडी होणार (Post-poll alliance of AAP and Congress?) अशी चर्चा सुरू झाली होती. निवडणुकीचे निकाल पाहून आप आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली होती. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार संदीप दिक्षीत Sandeep Dikshit यांना याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की काँग्रेस आणि आपच्या निवडणूक पश्चात आघाडीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाहीये. ANI शी बोलताना दिक्षीत यांनी म्हटले की ही आघाडी करायची की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घ्यायचा आहे.
ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळले? यादी आली समोर
दिल्लीमध्ये आप आणि भाजपमध्ये कडवी झुंज..
दिल्लीच्या सत्तासंघर्षामध्ये प्रमुख लढत ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये दिसून येत होती. एकेकाळी इथे सत्तेत असलेल्या काँग्रेसला या संघर्षात एकही राजकीयतज्ज्ञ स्थान द्यायला तयार नव्हता. बहुतांश एक्झिट पोलमध्येही भाजप किंवा आप या दोघांनाच पुन्हा संधी असल्याचे दाखवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारामध्ये यमुना नदीचे प्रदूषण आणि अरविंद केजरीवाल यांच्या आलिशान निवासस्थानावरून जोरदार टीका केली होती. मोदींनी वापरलेले 'आपदा' आणि 'शीशमहल' हे शब्द बरेच गाजले होते. आपने मात्र आपला प्रचार 11 वर्षांमध्ये केलेल्या कामकाजाभोवती फिरवत ठेवला होता. दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. इथे 60.54 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.