Odisha Fire: मोठी दुर्घटना! रुग्णालयातील ICU विभागात भीषण आग, 10 रुग्णांचा मृत्यू

हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) भीषण आग लागली, ज्यामध्ये  आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Odisha: A fire broke out at Trauma Care ICU:  ओडिशातील कटक येथील सरकारी एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी रुग्णांना वाचवताना रुग्णालयातील ११ कर्मचारी भाजले. ही घटना पहाटे २:३० ते ३:०० च्या दरम्यान रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागातील आयसीयूमध्ये घडली.

मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडव, आयसीयूमधील 10 रुग्णांचा मृत्यू

ओडिशातील कटकमध्ये सोमवारी पहाटे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कटक येथील सरकारी एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) भीषण आग लागली, ज्यामध्ये  आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत रुग्णांना वाचवताना 11 कर्मचारी गंभीर भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

Advertisement

Pune News: पोटभर खा अन्... पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात, समर्थ स्नॅक्स सेंटरच्या निर्णयाने मन जिंकलं

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दीर्घकाळ चाललेल्या ऑपरेशननंतर आग आटोक्यात आणली. रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीने आयसीयूमधील रुग्णांना सुरक्षितपणे इतर वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तरीही परिस्थिती आणखी बिकट झाली कारण अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर होती.

मुख्यमंत्र्यांची भेट, कुटुंबियांना 25 लाख देणार 

 त्याचबरोबक ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येते. एकूण २३ रुग्णांना इतर विभागात हलवण्यात आले होते, त्यापैकी ७ रुग्णांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला, तर ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुख्यमंत्री माझी यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.  घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, आगीचे खरे कारण आणि जबाबदार कोण हे शोधण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

Nashik News : नितेश राणेंच्या वक्तव्याला मुस्लीम तरुणांचं 'एकते'तून उत्तर; नाशिकमध्ये त्या पोस्टरची चर्चा