Online Betting:ईडीच्या रडारवर दिग्गज सेलिब्रिटी! युवराज सिंग,शिखर धवनसह 'या' कलाकारांची संपत्ती होणार जप्त?

Online Gaming And Betting Latest News : ऑनलाइन सट्टेबाजी आणि गेमिंग संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिग्गज खेळाडू आणि फिल्मी कलाकार रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
ED On Online Betting Case

Online Gaming And Betting Latest News : ऑनलाइन सट्टेबाजी आणि गेमिंग संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिग्गज खेळाडू आणि फिल्मी कलाकार रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) लवकरच या बड्या सेलिब्रिटींची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. ही धडक कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत करण्यात येईल. ईडीने मागील तपासादरम्यान, युवराज सिंग,सुरेश रैना,रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन यांसारख्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंची चौकशी केली आहे. इतकच नव्हे तर, ईडीने अभिनेता सोनू सूद,तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती आणि अंकुश हाजरा यांनाही चौकशीच्या घेऱ्यात घेतल्याचं समजते. दरम्यान, ईडी अनेक प्रसिद्ध खेळाडू आणि चित्रपट कलाकारांवर कायदेशीर कारवाई करू शकते, असं म्हटलं जात आहे. 

बेकायदेशीरपणे कमावलेली संपत्ती परदेशात 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म 1xBet संबंधीत प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती उघड झालीय. या व्यक्तींनी त्यांना मिळालेल्या मानधनातून अनेक प्रकारच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. परंतु,या मालमत्ता पीएमएलए कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत. बेकायदेशीरपणे कमावलेली संपत्ती या कॅटेगरीत या मालमत्तेचा उल्लेथ करण्यात आला आहे.यापैकी अनेक संपत्ती संयुक्त अरब अमिरात (UAE)सारख्या देशांमध्ये आहेत. सध्या या सर्व मालमत्तांचे मुल्यांकन सुरु आहे. 

मनी लॉण्ड्रिंग कायद्यांतर्गत जप्तीचे आदेश

केंद्रीय तपास यंत्रणा लवकरच या सेलिब्रिटींच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी PMLA अंतर्गत जप्तीचे आदेश जारी करणार आहेत. जप्तीचे आदेश दिल्यानंतर पीएमएलए संबंधीत प्राधिकरणाकडे याबाबतची खात्री करणार आहे. त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर या मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल. केंद्र सरकाने ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी नुकतंच एक विधेयक पारित केलं आहे. 

युवराज,रैना,सोनू सूदसारख्या सेलिब्रिटींची चौकशी होणार

ईडीने तपासाचा भाग म्हणून मागील काही आठवड्यांमध्ये युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन सारख्या क्रिकेटर्सची चौकशी केली आहे. तसच अभिनेते सोनू सूद, मिमी चक्रवर्ती (माजी तृणमूल खासदार)आणि अंकुश हाजरा (बांग्ला सिनेमा) यांचीही चौकशी केल्याची माहिती समोर आलीय. तसच काही सोशल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही चौकशीच्या घेऱ्यात आहेत. 

Advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार, यापैकी अनेक व्यक्तींनी तपास अधिकाऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांचे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती दिली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना जाहीरातीचं मानधन कसं मिळालं, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा आणखी काही खेळाडू आणि कलाकारांचे जबाब नोंदवणार आहे. ईडीने 1xBet ची इंडिया एंबेसेडर अभिनेत्री उर्वशी रौतेलाला समन्स बजावलं होतं. परंतु, ती परदेशात असल्याने तिचा जबाब नोंदवला गेला नाही. दरम्यान, 1xBet वर 22 कोटी भारतीय यूजर्स होते.